एकता महिला ग्रुपच्या वतीने मंगळागौर कार्यक्रम

हडपसर : एकता महिला ग्रुपच्या वतीने मंगळागौर कार्यक्रमाचे हडपसर माळवाडी रोड अन्नपूर्णा हॉल येथे आयोजन करण्यात आले होते.

15 ऑगस्ट असल्यामुळे मंगळागौरीची सुरुवात राष्ट्रगीतापासून करण्यात आली.

मंगळागौर श्रावण हा धार्मिक व्रत-वैकल्यांचा, सणांचा पवित्र महिना समजला जातो. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अतिशय महत्व आहे. तसे श्रावणात आठवड्यातील सातही वारांना महत्व आहे. कारण शिवपूजनाला महत्व असणाऱ्या या पवित्र महिन्याची वाट वर्षभर पाहिली जाते. याच महिन्यात येणारे मंगळागौरीचं व्रतमंगळागौरीला विविध खेळ खेळण्याची फार पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे.यामध्ये लाट्या बाई लाट्या सारंगी लाट्या, फू बाई फू, अठूडं केलं गठूडं केलं यासारखी पारंपरिक गाणी आणि खेळ खेळण्याची मजा वेगळीच असते.मंगळागौरीचे हे व्रत कष्टाचे आणि दमायचे नसून शरीराला आणि मनाला चपळता देणारे, चैतन्य आणणारे आणि एकजुटीचा आनंद देणारे आहे असे म्हटले जाते.


या कार्यक्रमात, एकता ग्रुप कडून प्रत्येक सहभागी ला गिफ्ट्स, आणि काही बेस्ट लुक लकी ड्रॉ पण काढण्यात आले. विजेत्यांना गिफ्ट्स अर्चना पुस्तके, योगिता हरपळे, श्रद्धा घडशी, दीप्ती बोरा, यांनी दिले,आणि ओटी भरून तिचे स्वागत केले.

कार्यक्रमाचे आयोजन वैशाली वाडकर, संध्या शेंडगे, यांनी केले होते. या कार्यक्रमांमध्ये हडपसर परिसरातील महिला सहभागी झाल्या होत्या.

See also  राजीव गांधी पंचायत राज संघटन व पुणे शहर काँग्रेसच्यावतीने आंदोलन