१५,००० कुटुंबांना माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या वतीने दिवाळी सरंजाम वाटप करून आपुलकीची दिवाळी साजरी

बालेवाडी : बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सुस आणि म्हाळुंगे परिसरात राहणाऱ्या मराठवाड्यातील कष्टकरी, कामगार बांधवांसह पूरग्रस्त कुटुंबांची दिवाळी गोड व्हावी या हेतूने सुमारे १५,००० कुटुंबांना माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या वतीने दिवाळी सरंजाम वाटप करून आपुलकीची दिवाळी साजरी करण्यात आली.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या “सण साजरा करताना सामाजिक जबाबदारी विसरू नका” या संदेशाला प्रतिसाद देत हा उपक्रम राबविण्यात आला. याद्वारे सामाजिक बांधिलकीचे प्रभावी उदाहरण घालून देण्यात आले असून मराठवाड्यातील नागरिकांच्या आनंदात भर टाकण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.या कार्यक्रमाच्या माध्यमातून ‘आपला मराठवाडा सेवा संघ’ या संस्थेचा शुभारंभ झाला. संस्थेच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि सामाजिक पुनर्वसनासाठी विविध उपक्रम हाती घेतले जाणार आहेत.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बोलताना मत मांडले की, “अमोल बालवडकर यांनी ‘आपला मराठवाडा सेवा संघ’ उभारून मराठवाड्याच्या नागरिकांसाठी स्थायी व्यासपीठ निर्माण केले आहे.” असे बोलून त्यांनी सदरील उपक्रमाबाबत कौतुक केले.

माजी केंद्रीय मंत्री मा. श्री. रावसाहेब दानवे पाटील म्हणाले, “गेल्या दहा वर्षांपासून अमोल बालवडकर हे १५ हजारांहून अधिक कुटुंबांना दिवाळी सरंजाम वाटप करत असून, हे त्यांचे समाजाशी असलेले घट्ट नाते दर्शवते.” अशा शब्दांत त्यांनी देखील कौतुकाची थाप दिली.

सदर कार्यक्रमाला १५ हजारांहून अधिक नागरिक उपस्थित होते. सामाजिक भान, जनसंपर्क आणि जनसेवा या तिन्ही स्तरांवर या उपक्रमाने एक नवा आदर्श निर्माण केला.

“राजकारण हे निवडणुकीपुरतेच मर्यादित नसून लोकांच्या संकटात त्यांच्या सोबत उभे राहणे हीच खरी जनसेवा आहे. ‘आपुलकीची दिवाळी, मराठवाड्यासाठी’ हा त्याच विचाराचा एक भाग आहे,” असे मत मांडून उपस्थितांचे आभार मानले.

यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत दादा पाटील, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, अशोक मुरकुटे, रतन बालवडकर, प्रकाशतात्या बालवडकर, माजी नगरसेवक किरण दगडे, राहुल कोकाटे, प्रल्हाद सायकर, स्वप्नालीताई सायकर, ज्योतीताई कळमकर, गणेश कळमकर, लहूशेठ बालवडकर, वैदेही बापट, अंबादास कोकाटे, सुरेश कोकाटे, हभप संजयबाप्पु बालवडकर, सुभाष भोळ, राजेंद्र पाडाळे, प्रमोद कांबळे, अनिकेत चांदेरे, सुहास भोते, अनिल ससार, उमाताई गाडगीळ, अस्मिताताई करंदीकर, कल्याणी टोकेकर, वैशाली कमाजदार, मिनाताई पारगावकर, मोरेश्वर बालवडकर, शांताराम जांभुळकर, आत्माराम बालवडकर, अनिल बालवडकर, सचिन कोकाटे, गोविंद रणपिसे, रामदास विधाते, विजय विधाते, राजेंद्र मुरकुटे, अमर लोंढे, सोपान खैरे, कालिदास शेडगे, भानुदास पाडाळे, नामदेव पाडाळे, नामदेवराव गोलांडे, शिवाजी खैरे, भगवान खैरे, प्रभाकर पाडाळे, अशोक पाडाळे, माऊली सुतार, नंदकुमार गायकवाड, व अमोल बालवडकर फाऊंडेशन चे सर्व सभासद तसेच बाणेर-बालेवाडी- सुस-म्हाळुंगे -पाषाण-सुतारवाडी- सोमेश्वरवाडी भागातील मान्यवर तथा ग्रामस्थ उपस्थित होते.

See also  मेट्रो व एल अँड टी च्या ढिसाळ कामांबाबत मनपा ची जबाबदारी नाही काय❓️ एरंडवाना कर्वेनगर येथील प्रलंबित कामांबद्दल भाजपाचे संदीप खर्डेकर यांचा आयुक्तांना प्रश्न