सर्वसामान्यांचा जीवन स्तर मोदींनी उंचावला- ब्रजेश पाठक

पुणे ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा योजना खऱ्या लाभार्थ्या पर्यंत पोहचल्या की नाही याची काळजी घेतली. ज्यांना योजनांचा लाभ मिळाला नाही त्यांच्यासाठी रचना केली. गरीब कल्याणच्या योजनांची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी करून सर्व सामान्यांचा जीवन स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न केले, असे मत उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी व्यक्त केले.

आगामी लोकसभा निवडणूक तयारीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक बुधवारी पुणे क्लस्टरमधील पुणे लोकसभा मतदार संघातील भाजपच्या बूथ प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते. पक्षाचे शहर अध्यक्ष धीरज घाटे अध्यक्ष स्थानी होते.

प्रदेश सरचिटणीस आणि निवडणूक प्रमुख मुरलीधर मोहोळ,  उपाध्यक्ष आणि क्लस्टर समन्वयक राजेश पांडे, प्रभारी माधव भांडारी, आमदार माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, दिलीप कांबळे, मकरंद देशपांडे, संयोजक श्रीनाथ भिमाले, मकरंद देशपांडे, जगदीश मुळीक, सुनील देवधर, वर्षा डहाळे, बापू पठारे, हेमंत रासने, राजू शिळीमकर, पुनीत जोशी, रवी साळेगावकर, दीपक पोटे, सुशील मेंगडे, करण मिसाळ, हर्षदा फरांदे, गणेश बिडकर, संदीप खर्डेकर व्यासपीठावर उपस्थित होते.

मोहोळ म्हणाले, आगामी निवडणुकीच्या तयारीची महाबैठक आहे. तीन मतदारसंघाचे क्लस्टर केले. देशभर क्लस्टर मध्ये बैठका आहेत. बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, सुपर वॉरियर्सच्या माध्यमातून लोकसभेत विजय मिळवू. त्यासाठी सर्वांना खूप कष्ट करावे लागतील. वातावरण सकारात्मक आहे.

नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी कार्यकर्त्यांनी शंभर दिवस पक्षाच्या कामासाठी द्यावेत असे आवाहन राजेश पांडे यांनी केले.

See also  कोथरुडकरांठी मोफत महा ईसेवा केंद्र नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचा उपक्रम