म्हातोबा नगर कोथरूड मधील राडारोड्याच्या वाहतुकीमुळे नागरिक त्रस्त

कोथरूड : म्हातोबानगर, कोथरुड या ठिकाणी गेले ४/५दिवसा पासून अज्ञात हायवा ट्रक वाहने राडारोडा टाकण्याकरीता मोठ्या प्रमाणावर वाहतूक करत आहेत.
या वाहनांचे वेग जास्त असल्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरुन ये जा करावे लागत आहे. त्यात ह्या वाहनांचे नंबर प्लेट सुद्धा दिसत नाहीत. त्यांची सर्व तपासणीकरण्यात यावी. अशी मागणी मनसे शाखा अध्यक्ष किरण उभे यांनी केली आहे. याबाबतीत उभे यांनी महापालिकेच्या कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त केदार वझे यांना निवेदन दिले आहे.
उभे म्हणाले, गेली अनेक वर्षांपासून म्हातोबा नगर चा मुख्य रस्ता प्रलंबित असल्यामुळे नागरीक आधीच त्रस्त आहेत. आणि कच्चा रस्ता असल्याने आता या अज्ञात वाहनांमुळे मोठ्या प्रमाणावर धूळ उडून सदर ठिकाणी धुळीच साम्राज्य निर्माण झाले आहे. धुळीमुळे लहान मुलांना आणि जेष्ठ नागरिकांना खोकला आणि श्वासनाचे त्रास जानऊ लागलेआहेत,त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातारणआहे. एखादा अपघात घडल्यास त्यास प्रशासन सर्वस्वी
जवाबदार असेल.तरी संबंधित वाहनांवर आणि संबंधितांवर कडक
करवाई करावी. त्वरित काम थांबवावे व ही वाहने जप्तकरण्यात यावी. अन्यथा स्थानिक नागरिकांना सोबत घेऊनमनसे स्टाइल आंदोलन करण्यात येईल. असा इशाराही यांनी दिला आहे.

See also  खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग १ जमिनीसाठी अधिनियमात सुधारणा