औंध रोड येथील डॉ.आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा : सुनील माने यांची महापालिका आयुक्तांची भेट

पुणे : औंध रोड येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवणे नियोजित आहे. यासबंधी सर्व प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर हा पुतळा येथे बसवावा तसेच येथे सुशोभीकरणासाठी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सुनील माने यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडे केली. याबाबतचे निवेदन त्यांना भेटून दिले.

औंध रोड येथील आंबेडकर चौक येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्याचे नियोजन पुणे महापालिके मार्फत करण्यात आले आहे. यासाठी सर्व परवानग्या घेण्याचे काम पूर्ण झाले आहे.

हा पुतळा बसवण्यासाठी प्रशासकीय पूर्तता आणि टेंडर प्रक्रिया सुरु करण्यासाठी सबंधित अधिकाऱ्यांना आपण निर्देश द्यावेत. तसेच या पुतळ्याच्या चौथरा सुशोभीकरणासाठी महापालिकेकडून ५० लाख रुपयांची वित्तीय तरतूद करावी. लवकरच महापालिकेचा अर्थसंकल्प तयार केला जाणार आहे. त्यामुळे या निधीची तरतूद अर्थसंकल्पात करावी अशी विनंती आज आयुक्तांकडे केली. याबाबत सकारात्मक विचार करण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.

See also  "रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पब, बार व हॅाटेल चालकांवर कारवाई करा"- लहू बालवडकर