सुस-म्हाळुंगे हद्दीवर PMPML बस सेवा सुरु, आता लवकरच पाण्याच्या लाईनचे काम सुरु करणार – अमोल बालवडकर

सुस : सुस-म्हाळुंगे हद्दीवरील अगदी शेवटच्या भागात असणार्या निलांचल सोसायटी ते पुणे मनपा अशी बस सेवा परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरीकांच्या उपस्थितीमध्ये सुरु करण्यात आली.
मागील आठवड्यामध्ये या परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरीकांनी व विशेषतः महिलांनी या परिसरात दळण-वळणाकरीता नागरीकांना सार्वजनिक वाहतुक व्यवस्था उपलब्ध नाही, तरी या परिसरात पी.एम.पी.एम.एल. बस सेवा सुरु करण्याची मागणी नागरिकांमधून केली होती.
याचीच तातडीने दखल घेवुन पी.एम.पी.एम.एल.च्या वरीष्ठ अधिकार्यांशी चर्चा करुन त्वरीत बससेवा सुरु केली आहे.
या भागात सार्वजनिक वाहतुक व्यवस्था नसल्याने नागरीकांची गैरसोय होत होती परंतु आता या बससेवेचा फायदा या भागीतील ज्येष्ठ नागरीक, महिला तसेच विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.

यावेळी नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती कळमकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर, मा.सरपंच नारायण चांदेरे, युवा नेते अनिलबाप्पु ससार, युवा नेते शरद भोते, अभय तडवळकर, संदिप प्रधान, हरिभाऊ कुलकर्णी, सुषमा देशमुख, विजयराव देशपांडे, राजेंद्र नेवे, रविंद्र वैद्य, सुनिल देशमुख, प्राची घाटे, लता बिराजदार तसेच सर्व नागरीक व महिला उपस्थित होते.


“अनेक वर्षांची प्रतिक्षा संपली व आम्हा सर्व ज्येष्ठ नागरीकांना कोणत्याही अडथळा न येता प्रवास करणे व शहरातील इतर भागात दळण-वळण करणे सोपे झाले. आमच्या समस्येची तातडीने दखल घेवुन ती सोडवल्याबद्दल या भागातील नगरसेवक अमोल बालवडकर तसेच सर्वच भाजपा पदाधिकार्यांचे आम्ही आभार मानतो” असे मत या परिसरातील ज्येष्ठ नागरीकांनी व्यक्त केले.

यावेळी विबग्योर स्कुलच्या परिसरात गतिरोधक बसवुन तसेच वाहतुक व्यवस्थेचे योग्य नियोजन केले. या भागातील वाहतुक कोंडीचा प्रश्न सोडविल्याबद्दल सर्व सभासदांनी आभार व्यक्त केले.

तसेच यापरिसरात येत्या २-३ महिन्यांमध्ये पुणे मनपाच्या माध्यमातुन २४x७ समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत सुमारे १८०० मी. लांबीच्या दोन लाईन त्यामध्ये २० इंच व्यासाची ट्रान्समिशन लाईन व ६” व्यासाची डिस्ट्रिब्युशन लाईन टाकण्याचे काम पुर्ण करण्यात येणार आहे असा शब्द या सर्व नागरीकांना दिला.

See also  सोमेश्वरवाडी येथे राज ठाकरे यांच्या हस्ते मनसे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन