पुणे : महाराष्ट्राची शौर्या गणेश इंगवले (वय १३) शाळा रविंद्रनाथ टागोर स्कुल ऑफ एक्सलन्स (बालेवाडी) मधे शिकत असून हिने ३–८ नोव्हेंबर २०२५ दरम्यान मणिपूर येथे झालेल्या सब-ज्युनिअर राष्ट्रीय फेन्सिंग स्पर्धेत वैयक्तिक तसेच टीम स्पर्धेत कांस्य पदक जिंकले. टीम कॅटेगरीत महाराष्ट्राने पंजाबचा ४५–४३ असा थरारक पराभव केला असून, त्यात शौर्याने एकटीने २२ गुण मिळवत महत्त्वपूर्ण योगदान दिले. वैयक्तिक गटात तिने तामिळनाडूच्या खेळाडूचा १५–१ अशा एकतर्फी स्कोअरने पराभव करून उल्लेखनीय कामगिरी केली.
या यशामागे शौर्याच्या प्रशिक्षकांचे—मुख्य प्रशिक्षक सौ. श्वेता मॅडम तसेच बोम्मई सर, व्हिक्टर सर आणि बेनिश सर—यांचे कौशल्यपूर्ण प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण मेहनतीचे मोठे योगदान आहे.
घर ताज्या बातम्या शौर्या गणेश इंगवले हिने मणिपूर येथे झालेल्या सब-ज्युनिअर राष्ट्रीय फेन्सिंग स्पर्धेत वैयक्तिक...





















