औंध : औंध परिहार चौकात दीड महिन्यापूर्वी अचानक 30 अनधिकृत तयार स्टॉल फुटपाथ वर आणून ठेवण्यात आले होते. ह्या स्टॉलला महापालिकेची मान्यता नव्हती. पुणे महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे तत्कालीन उपायुक्त माधव जगताप यांनी सर्व नियम धाब्यावर बसवत तसेच या विभागाचा त्यांच्याकडे पदभार नसताना सुद्धा त्यांनी उपायुक्त श्री नंदकर यांचे अधिकार परस्पर दीड वर्ष वापरत व तत्कालीन आयुक्त विक्रमकुमार यांची दिशाभूल करून खोट्या व चुकीच्या निवेदनास मान्यता घेऊन तसेच यापूर्वीचे स्वतः दिलेल्या नकारात्मक अभिप्रायसह विविध विभागाचे सर्व नकारात्मक अभिप्राय दुर्लक्षित करून तसेच तत्कालीन अतिरिक्त आयुक्त ओगले मॅडम यांनी सदर शिवदत्त मिनी मार्केट बाबत स्थायी समिती व सर्वसाधारण सभेने यापूर्वी केलेल्या ठरावाची मुदत 2013 साली संपल्याने सदर शिवदत्त मिनी मार्केट फुटपाथ वरून निष्काषित करण्याचे आदेश दिले होते हा विषय दिवाणी न्यायालय व उच्च न्यायालयामध्ये रिट पिटीशन दाखल असतानी सुद्धा माधव जगताप यांनी कनिष्ठ अधिकाऱ्यांवर दबाव टाकून चुकीच्या व खोट्या शिफारशी घेऊन औंध परिहार चौकात फूटपाथ वर 30 स्टॉलचे बेकायदेशीर पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला होता.
सदर विषय भाजप प्रदेश प्रवक्ते ॲड डॉ मधुकर मुसळे , मा. नगरसेविका सौ अर्चना मधुकर मुसळे यांनी आयुक्त श्री राजेंद्र भोसले यांच्याकडे सर्व पुराव्यांशी मांडला होता व सदर स्टॉलवर कारवाई करण्याची मागणी केली होती. परंतु आयुक्तांकडून मे महिन्यामध्ये हे स्टॉल काढून टाकल्यानंतर ते स्टॉल ऑगस्ट महिन्यात त्या लोकांनी परत त्याच ठिकाणी आणून ठेवले होते एडवोकेट डॉक्टर मधुकर मुसळे यांनी त्यावर पुन्हा कारवाई करण्यासाठी आयुक्ताकडे पाठपुरावा केला असता आयुक्तांकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने ॲड डॉ डॉ मधुकर मुसळे यांच्या नेतृत्वाखाली औंध मधील नागरिकांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री श्री अजित दादा पवार यांची भेट घेतली व सर्व विषय पुराव्यानिशी त्यांच्याकडे मांडून कारवाईची मागणी केली.
या विषयात दादांनी लक्ष घातल व त्यानुसार आयुक्तांना आदेश दिले. त्यानंतर आयुक्तांनी सदर बेकायदेशीर स्टॉल काढण्यासाठी आदेश काढले परंतु त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पालिका प्रशासन टाळाटाळ करीत होते.
त्यामुळे ॲड डॉ मधुकर मुसळे यांच्या नेतृत्वात औंध मधील नागरिकांनी पुणे महानगरपालिकेच्या समोर तीव्र आंदोलन केल. यावेळी गाढवांच्या गळ्यामध्ये भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या तसेच विभागांच्या नावाच्या पाट्या लावून त्या गाढवावर उपायुक्त श्री माधव जगताप यांच्या भ्रष्टाचाराच्या रावणाच्या रूपातील प्रतिमा गाढवाच्या पाठीवर ठेवून मिरवणूक काढत मनपा मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्यात आले
आंदोलनाची पूर्व कल्पना देऊन सुद्धा सुद्धा आयुक्त महापालिकेत पोहोचले नव्हते त्यानंतर ॲड डॉ मधुकर मुसळे मा. नगरसेविका अर्चना मुसळे व 11 जणांनी आत्मदहन करण्याचा निर्णय घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी तो प्रयत्न हाणून पाडला.
शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी मध्यस्थी करत ॲड डॉ मधुकर मुसळे मा. नगरसेविका अर्चना मुसळे व त्यांच्या शिष्टमंडळाची स्टँडिंग कमिटी मध्ये आयुक्तासोबत भेट घडवून आणली. स्थायी समितीच्या बैठकीत ॲड मुसळे यांनी टपऱ्यावर कारवाई करून ताबडतोब काढून टाकण्याची तसेच सर्व नियम धाब्यावर बसवून स्वतःकडे पदभार नसताना सुद्धा दुसऱ्या अधिकाऱ्यांचे अधिकार परस्पर वापरून नियमबाह्य पद्धतीने बेकायदेशीर पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तत्कालीन उपायुक्त माधव जगताप यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली त्यास आयुक्तांनी तत्वतः मान्यता देत तीन दिवसाच्या आत सर्व टपऱ्या काढण्यात येतील व माधव जगताप यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले त्यानुसार दुसऱ्याच दिवशी सकाळी 5:30 वाजता अतिक्रमण विभागाचे उपायुक्त श्री बनकर सहाय्यक आयुक्त श्री गिरीश दापकेकर यांच्यासह 60-70 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या फौजफाट्यासह कारवाई करून सर्व टपऱ्या काढून टाकण्यात आल्या व फुटपाथ नागरिकांसाठी मोकळी करण्यात आली.
यावेळी प्रशांत शितूत विद्याधर भापकर श्री गांधी किरण पांचाळ श्री शंकर क्षीरसागर सुधीर मोरे रोहन कुंभार मयूर मुंडे अक्षय सांगळे प्रवीण राऊत मिसेस राऊत मिसेस महाजन संकेत सांगळे रेणुका बावधने मिसेस जाधव अर्पिता खोले रोहित धोत्रे गोविंद पटेल रमेश सांगळे श्री भोपळे रुपेश रुपेश घमभरे राजेंद्र थोरात शेखर विग्ने विद्याधर गुजर भारत नेहलांनी भावेश पटेल यांच्यासह अनेक जण उपस्थित होते