पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व पी. ई.सोसायटीचे मॉडर्न महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळ व पुणे शहर क्रीडा समिती आयोजित “अंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा ” विद्यापीठच्या इनडोअर हॉल मध्ये सुरु झाल्या.
कार्यक्रमाचे उदघाटन मेजर ध्यानचंद,एक उत्कृष्ट हॉकी पटू, भारताचे गौरव यांच्या प्रतिमेला हार घालून झाले. ‘एक पेड देश के नाम ‘या अंतर्गत बिजरोपण करण्यात आले.स्पर्धेचे उदघाटन प्र. कुलूगुरू डॉ.पराग कालकर यांच्या हस्ते झाले. प्र.कुलूगुरू पद स्विकारल्या नंतरचा हा त्यांचा पहिलाच कार्यक्रम होता.
याप्रसंगी बोलताना डॉ.पराग कालकर म्हणाले, “आरोग्य आणि आनंद हे क्रीडागांणा वर मिळतो जे Simultaneously आवश्यक आहे. रात्री उशिरा झोपणे व सकाळी उशिरा उठणे ही संस्कृती या मुळे मोडीत निघेल. विद्यापीठाने अत्यंत उच्च दर्जा असलेल्या सोयी केलेल्या आहेत. त्याचा खेळाडूंनी लाभ घ्या “
प्रास्ताविक करताना डॉ संजय खरात महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणाले, ” आमच्या महाविद्यालयात सर्वात जास्त छत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
दरवर्षी आंतरराष्ट्रीय पातळीवर SPPU विध्यार्थी खेळाचे प्रतिनिधित्व करतो हे खूप अभिमानास्पद आहे असे डॉ दीपक मानेक्रीडा संचालक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे डॉ दीपक माने म्हणाले.
या स्पर्धेमध्ये 236 विध्यार्थी खेळणार आहेत रोज तीन असे 9 राऊंड होणार आहेत.
पुरुष गटामध्ये तिसऱ्या फेरीनंतर तीन गुण मिळवून कशिष जैन (स. प. महाविद्यालय), मिहिर सरवदे (मॉडर्न शिवाजीनगर) ओम
लामकाने (मॉडर्न शिवाजीनगर)सौरभ म्हमाने (मॉडर्न शिवाजीनगर)दिगंबर जैल (पिईसिटी कॉलेज )विशाल कल्याणशेट्टी (एम ई एस जि सी सी कॉलेज )धैवत आपटे (मॉडर्न गणेशखिंड )साहिल शेजल (एस पी कॉलेज )आकाश कडनोर( मॉडर्न गणेशखिंड )मुक्तानंद पेंडसे (पिजीजी कॉलेज )
तर महिला विभागातील आघाडी :
इशिता रामदासी (व्ही आई टी कॉलेज )मानसी ठाणेकर (ई एल ओ )समीक्षा धस (बी एम सि सि )चिन्मयी प्रभू (व्ही आई टी )दिया कंटक (कमीन्स कॉलेज )मुस्कान जैन (सिम्बॉसिस कॉलेज )प्रिया धाकूळकर (COEP)राजनंदिनी जरग (एफ सि कॉलेज )ऋतुजा मालगुंडे (COEP)
या स्पर्धेला विविध महाविद्यालतील क्रीडा संचालक उपस्थित आहेत.या स्पर्धाविजेत्या मधून पुणे शहर क्रीडा समितीचे अंतरविभागीय खेळाडू व विद्यापीठातील संघ ठरेलं. यातील 22 खेळाडू फेडरेटिंग असणारे असतील असे डॉ दीपक शेंडकर, क्रीडा संचालक, मॉडर्न महाविद्यालय यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला विद्यापीठातील तसेच महाविदयालयातील मान्यवर उपस्थित होते.