‘सुस–नांदे रस्त्यावरील सनीज वर्ल्ड जवळील चढ कमी करून रस्त्याचे रुंदीकरण’ करण्याच्या महत्त्वाच्या कामाचा शुभारंभ  आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते संपन्न

सुस : आमदार शंकर मांडेकर यांच्या निधीतून मंजूर झालेल्या ‘सुस–नांदे रस्त्यावरील सनीज वर्ल्ड जवळील चढ कमी करून रस्त्याचे रुंदीकरण’ करण्याच्या महत्त्वाच्या कामाचा शुभारंभ  आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते संपन्न झाला. या कामामुळे नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीतील अडथळे दूर होऊन सुरक्षित, सुरळीत आणि वेगवान प्रवासाचा मार्ग मोकळा होणार आहे.

यावेळी पुणे जिल्हा पीडीसीसी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, उद्योजक शिवाजी काळे, बाबुराव चांदेरे, माजी नगरसेवक प्रमोद अण्णा निम्हण, माजी नगरसेविका सुषमा निम्हण, माजी नगरसेविका रोहिणी चिमटे, पुणे महानगरपालिकेचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, कार्यकारी अभियंता दिलीप काळे, अधिकारी शिवानंद पाटील, राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी पुणे शहराच्या कार्याध्यक्ष पूनम विशाल विधाते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष राहुल बालवडकर, नांदेगावच्या माजी सरपंच निकिता रानवडे तसेच पक्षाचे पदाधिकारी, सुस व नांदे गावचे आजी-माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध सोसायटींचे चेअरमन व पदाधिकारी आणि सुस व नांदे गावचे ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

स्थानिक नागरिकांची गेले अनेक वर्षापासून मागणी होती. सनीज वर्ल्ड येथील खिंडी मधील चढा रस्ता कमी केल्याने मोठी जड वाहने वेगाने पुढे जाणार असून या परिसरात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मदत होणार आहे. तसेच या परिसरातील रस्ता रुंदीकरण होणार असल्यामुळे सुसगाव परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तसेच नांदेगाव व सिम्बॉयसिस हॉस्पिटल कडे जाणाऱ्या नागरिकांना देखील याचा फायदा होणार आहे.

See also  पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघात राजकीय पक्षांची बैठक संपन्न