आयुक्त साहेब भाजी मंडई भाजी विक्रीसाठी आणि रस्ते वाहतुकीसाठी असतात, पालिकेच्या बांधलेल्या भाजी मंडईमध्ये आठवड्या बाजार भरवायला परवानगी द्या रस्त्यावर नको..

पुणे : करोडो रुपये खर्च करून पुणे महानगरपालिकेने बांधलेल्या भाजी मंडई केले अनेक वर्ष बंद अवस्थेत आहेत. भाजी मंडई धुळखात पडल्या असून राजकीय कार्यकर्त्यांचे आठवडे बाजार मात्र बिनभाड्याच्या रस्त्यावर दिमाखात सुरू आहेत. भाजी मंडई ही भाजी विक्रीसाठी बांधली असून रस्ते हे वाहतुकीसाठी बांधले आहेत याची कल्पना पुणे महानगरपालिका आयुक्त यांना देण्याची गरज सध्या सुरू असलेल्या अनधिकृत आठवडे बाजारांमुळे निर्माण झाली आहे.

बाणेर बालेवाडी औंध पाषाण सुस महाळुंगे सोमेश्वर वाडी आधी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अनाधिकृत आठवडे बाजार रस्त्यांवर भरवले जात आहेत. यावर सातत्याने कारवाई करण्याची यंत्रणा उभारण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. परंतु राजकीय वरदहस्थामुळे याकडे प्रशासन सोईस्कर दुर्लक्ष करत असल्याची बाब सातत्याने समोर येत आहे. रस्त्यांवर आठवडे बाजार भरल्यानंतर तक्रार करून देखील अतिक्रमण विभागाकडून कारवाई होत नाही यामुळे रस्त्यावरून चालणारे पादचारी नागरिक व वाहन चालक यांना याचा त्रास सहन करावा लागतो.

पुणे महानगरपालिकेच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये भाजी मंडईचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु या बांधलेल्या भाजी मंडईमध्ये आठवडे बाजार भरवण्यास परवानगी दिली जात नाही. याउलट पालिकेच्या अमेनिटी स्पेस, रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात ठीक ठिकाणी आठवडे बाजार भरवले जात आहेत. यामुळे पुणे महानगरपालिकेचे भाजी मंडई बंद ठेवून रस्त्यांवर भाजी मंडई भरवण्याचे धोरण कोणते आहे याबाबत उपहासात्मक विचारणा सातत्याने केली जात आहे.

रस्त्यांवर तसेच पालिकेच्या ॲम्युनिटी स्पेस मध्ये राजकीय कार्यकर्त्यांचे सुरू असलेले आठवडे बाजारामध्ये प्रति स्टॉल मागे आर्थिक फायदा मिळत असल्याने आठवडे बाजार चालक ग्राहकांना चढ्या दराने भाजी विक्री करतात. यामुळे शेतकरी ते ग्राहक असा उद्देश सध्या तरी सफल होताना पाहायला मिळत नाही. महानगरपालिका स्तरावर आठवडे बाजारा संदर्भात ठराव करून बंद भाजी मंडईमध्ये आठवडे बाजार भरवण्यास परवानगी द्यावी तसेच रस्त्यावर भरवल्या जाणाऱ्या आठवडे बाजारांवर विशेष पथक नेमणूक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

See also  आर्ट ऑफ लिव्हिंगसमवेत जलयुक्त शिवार आणि नैसर्गिक शेतीचा सामंजस्य करार