सुस : भोर वेल्हा मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या सुस-नांदे (सनी वर्ल्ड) खिंड रस्त्याचे रुंदीकरण व चढ कमीकरण कामाची पाहणी आमदार शंकर मांडेकर यांनी केली.
या कामामुळे नागरिकांच्या दळणवळणाला अधिक गती मिळून रस्ता अपघातांमध्येही मोठी घट होणार आहे. यावेळी माजी नगरसेवक प्रमोद निम्हण, बाबूराव चांदेरे, पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पुनम विधाते तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.
या पाहणीत आमदार शंकर मांडेकर यांनी कामावर कार्यरत यंत्रणेला कामातील त्रुटी दूर करण्यासाठी सुचना दिल्या. काम वेळेत पूर्ण करण्यास सांगितले. यावेळी नागरिकांनी समाधान व्यक्त केले.























