मोफत उपचारांचा रुग्ण हक्क संरक्षण कायदा केलाच पाहिजे; यासाठी रुग्ण हक्क परिषदेने केले रास्ता रोको आंदोलन!

पुणे- मोफत उपचार आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, रुग्णांना न्याय मिळालाच पाहिजे, रुग्ण हक्क संरक्षण कायदा झालाच पाहिजे अशा जोरदार घोषणा देत रुग्ण हक्क परिषदेच्या समस्त कार्यकर्त्यांनी आज फर्ग्युसन रस्त्यावरील डेक्कन जवळील गुडलक चौकामध्ये तीव्र निदर्शने करीत लक्षवेधी धरणे आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी केले.


अन्नसुरक्षा कायद्याच्या धर्तीवर औषधांच्या महागड्या किमतींना चाप लावण्यासाठी औषध सुरक्षा कायदा सुद्धा झाला पाहिजे. तसेच कायद्यानेच सर्व रुग्णांना मोफत उपचार मिळाले पाहिजेत यासाठी पुणे शहरासह राज्यभर ठीक ठिकाणी आम्ही आंदोलन करू असे रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण म्हणाले. यावेळी रुग्ण हक्क परिषदेचे दोनशेहून अधिक कार्यकर्ते गुडलक चौकामध्ये आंदोलन स्थळी उपस्थित होते.
रुग्ण हक्क परिषदेने केलेले या आंदोलनामध्ये अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्यासह परिषदेचे केंद्रीय सल्लागार अनिल गायकवाड, पुणे शहर अध्यक्ष अपर्णाताई साठे मारणे, दत्ता पाकीरे, अमोल पडळकर, संजय कुरकुटे, यशवंत भोसले, अनिकेत कांबळे, प्रभाताई अवलेलू, रोहिदास किरवे, भानुदास मानकर, कविताताई डाडर, दीपक खेडकर, महादेव बनसोडे, कुमार साबळे आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.


यावेळी आरोग्य मंत्री तानाजी सावंत तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी राजीनामा दिलाच पाहिजे अशाही घोषणा देण्यात आल्या. धर्मदाय रुग्णालयांमध्ये रुग्णांची अडवणूक केली जाते. बिल भरायला पैसे नसतील तर जिवंत रुग्ण तसेच मृतदेहालाही अडवून ठेवले जाते डांबून ठेवले जाते असा आरोप देखील रुग्ण हक्क परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केला.

See also  जागतिक मधुमेहदिन आणि राष्ट्रीय बालदिनानिमित्त शनिवारी; डॉ. रवींद्र नांदेडकर 'बालमधुमेह' या विषयावर मोफत मार्गदर्शन