औंध बाणेर हद्दीवरील 30 वर्ष रखडलेला रस्ता पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा; तब्बल तीस वर्षाच्या लढा नंतर मिळाला झोनिंग दाखला

औंध : तब्बल 30 वर्षानंतर पुणे महानगरपालिकेने बाणेर हद्दीमध्ये दिलेल्या झोनींग दाखल्यामुळे औंध बाणेर हद्दीवरील सर्वे नंबर 158 लगत असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते नागरस रस्ता 60 फुटी डीपी रस्ता करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बाणेर हद्दीमधील सर्वे नंबर 242 मधील तेजस्विनी सोसायटी मधील नागरिकांन प्रवीण नवले यांनी 1996 पासून याबाबत पाठपुरावा केला होता. पुणे महानगरपालिकेच्या विकास आराखड्यामध्ये औंध हद्दीतील सर्वे नंबर 158 व 159 मध्ये 18 मीटर डीपी रस्त्याचे प्रयोजन करण्यात आले होते. बाणेर गावाचा पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यानंतर हा रस्ता सरकवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यानंतर पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या मागणीनुसार 2010 मध्ये औंध बाणेर हद्दीची मोजणी करून हद्द निश्चिती करण्यात आली होती.

औंध हद्दीमध्ये रस्त्याच्या जागेतील साईड मार्जिन दाखवून नऊ मजली टोलेजंग इमारत उभारण्यात आली होती. डीपी रस्ता सरकवण्याचा प्रकार उघड झाल्यानंतर प्रवीण नवले यांनी सातत्याने पाठपुरावा करून पुणे महानगरपालिकेच्या झालेल्या चुका वारंवार अर्जाद्वारे दाखवून दिल्या. बाणेर हद्दीतील सर्वे नंबर 242 येथील झोनींग दाखला आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार करण्यात आलेल्या मोजणी मुळे देण्यात आल्याने हा रस्ता निश्चित करून पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गेले तीस वर्षाहून अधिक काळ रखडलेल्या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे व औंध बाणेर परिसरातील नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

दरम्यान बाणेर औंध हद्द निश्चित करण्यात आल्याने रस्त्याची जागा साईड मार्जिन दाखवून उभारण्यात आलेल्या इमारतींवर काय कारवाई पुणे महानगरपालिका करणार ही उत्सुकतेची ठरणार आहे.

See also  बाणेर-बालेवाडी योजनेचे १७ मे रोजी लोकार्पण करण्याच्या पालकमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना