पुणे : आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या कोअर कमिटीची बैठक घेत विविध संघटनात्मक मुद्द्यांवर चर्चा केली. शहरातील पक्ष संघटन, निवडणुकीसंदर्भातील आवश्यक तयारी, इच्छुकांकडून अर्ज मागवणे आणि निवडणूक रणनीती याबाबत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी संवाद साधला. पश्चिम महाराष्ट्राचे संघटन मंत्री श्री. मकरंद देशपांडे यांच्यासमवेत ही बैठक घेतली.
बैठकीस शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी केंद्रीय मंत्री श्री. प्रकाश जावडेकर, प्रदेश सरचिटणीस श्री. राजेशजी पांडे, ज्येष्ठ नेते श्री. दिलीप कांबळे, खासदार मेधा कुलकर्णी, निवडणूक प्रमुख श्री. गणेश बिडकर, आमदार श्री. भिमरावअण्णा तापकीर, आमदार श्री. सुनिल कांबळे, आमदार श्री. सिद्धार्थ शिरोळे, आमदार श्री. योगेश टिळेकर, श्रीनाथजी भिमाले यांच्यासह विस्तारित कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित होते.
























