कोथरूड मध्ये बड्या पक्ष्यामध्ये विद्यमान विरुद्ध निष्ठावंत असा संघर्ष

कोथरूड : कोथरूड मतदारसंघातील उमेदवारीवरून सुरू असलेल्या स्पर्धेतून बड्या पक्षामध्ये विद्यमान विरुद्ध निष्ठावंत असा संघर्ष उभा राहिला आहे. कायम बाहेरील उमेदवार लादत असल्यामुळे बड्या पक्षातील ‘निष्ठावंत’ एकवटले आहेत. अन्य ठिकाणी वास्तव्यास असलेले प्रभागात उमेदवारी मिळवत २०१७ ची निवडणूक जिंकली देखील, घर झाले, ऑफिस बनवले, आता पुन्हा तेच माजी नगरसेवक पुन्हा पक्षाला वेठीस धरून आश्वासने पदरात पाडून घेत आहेत. असे प्रकार पक्षाला घातक असल्याने पक्षसंघटना खिळखिळी झाल्याचा दावा या ‘निष्ठावंतांनी’ थेट चर्चा सुरू केली आहे.

महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारीवरून सर्वच पक्षात जोरदार रस्सीखेच दिसून येत आहे. परंतू बडा पक्ष वगळता अन्य पक्षांना उमेदवार शोधावे लागत आहे. बड्या पक्षामध्ये उमेदवारीची स्पर्धा अन्य पक्षांच्या तुलनेत अधिक तीव्र बनली आहे. त्यातच अनेक वर्ष पक्षाचे काम करत प्रभागात पक्ष वाढवत असून अनेक स्थानिकांना पदाधिकारी यांना संधी न दिल्यास मूळ बड्या पक्षामध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. पालिकेची उमेदवारी, पक्षाची मोठी मोठी देत ठराविक जणांना संधी देत असल्याने ‘आम्ही सतरंज्यांच उचलायच्या का?’ असा सवाल आता मूळ कार्यकर्त्याकडून केला जात आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी घ्यायची, निवडून यायचे आणि प्रभागात घर घेऊन स्थानिक म्हणून घ्यायचे अशा विरोधात बड्या पक्षाचे जुने कार्यकर्ते एकवटले आहेत. आम्हाला सतत गृहीत धरल्यास पक्षाचे नुकसान होईल, अशी चर्चा या निष्ठावंतांमध्ये महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने सुरू झाली आहे. पालिकेची आमच्या जुन्यापैकी कोणालाही उमेदवारी द्या अशी मागणी या निष्ठावंतांनी स्थानिक आमदार, खासदार यांच्याकडे करणार असल्याची चर्चा आहे.

अशी आहे निष्ठावंतांची भूमिका
मागील महापालिका निवडणुकीचा इतिहास पाहता एक, दोन, तीन व चारच्या प्रभागात कायम आयात उमेदवार लादला गेला आहे यामुळे मूळ बड्या पक्षाचे कार्यकर्ते नाराज असून, काहींनी उघडपणे बोलण्यास सुरुवात केली आहे. आम्ही ३०-४० वर्षे पक्षाचे काम प्रामाणिकपणे करूनही आम्हाला कुठलेही पदे मिळाली नाही. उलट मागील ५ ते १० वर्षांत इतर ठिकाणांहून आलेल्या उपऱ्यांना लाभाची मोठ-मोठी पदे दिली गेली. यामुळे कोथरूडमध्ये बड्या पक्षाची पक्षसंघटना खिळखिळी झाली असल्याचा दावा मूळ कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.उमेदवारी न मिळाल्यास
यंदा जर मूळ स्थानिकांचा विचार न केल्यास शांतपणे काम करणार आहोत. त्यामुळे येत्या निवडणुकीला काय दिसेल हे सांगणे कठीण आहे. पक्षानेच विचार करावा असे आम्हाला वाटते.

See also  निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी मतमोजणी व्यवस्थेचा घेतला आढावा

उमेदवारी न मिळाल्यास
यंदा जर मूळ स्थानिकांचा विचार न केल्यास शांतपणे काम करणार आहोत. त्यामुळे येत्या निवडणुकीला काय दिसेल हे सांगणे कठीण आहे. पक्षानेच विचार करावा असे आम्हाला वाटते.