औंध : औंध बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मधील महाविकास आघाडीच्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये इच्छुक उमेदवारांनी एकत्र येत आगामी पुणे महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये ‘विजय संकल्प’ केला. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, शिवसेना व मनसे पक्षाचे इच्छुक उमेदवार उपस्थित होते.
यावेळी माजी नगरसेवक श्रीकांत पाटील, माजी नगरसेवक कैलास गायकवाड, राष्ट्रवादी राज्य प्रवक्ते सुनील माने, नाना वाळके, निलेश जुनवणे, विनोद रणपिसे, विशाल जाधव, इंद्रजीत भालेराव, एडवोकेट रमेश पवळे, मयूर बोराडे, अमर अडगळे, आदित्य ओवाळ, स्नेहल बांगर, प्राजक्ता गायकवाड, अदिती गायकवाड, ज्योती परदेशी, वसुधा निर्भवणे, मानसी ओवाळ, संजय अग्रवाल, रणजीत शिंदे, गोविंद निंबाळकर, सिद्दिक पठाण, फिरोज मुल्ला, सोनाली जुनवणे, अन्वर शेख, फराह शेख, मनाली गायकवाड, केतन गायकवाड, माजी नगरसेवक नंदलाल धिवार, सुंदर लोक ओवाळ, विजय जगताप, जय चव्हाण, किशोर वाघमारे, कृष्णा पवार निखिल कांबळे, निलेश रूपटक्के आदी उपस्थित होते.
यावेळी मागील निवडणुकीमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी वेगळी लढली होती. यंदाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी संघटितपणे भाजपाच्या सामोरे लढण्यासाठी सज्ज आहे यामुळे महाविकास आघाडीचा विजय हा निश्चित होणार असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला. पुणे महानगरपालिकेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणुका लढणार आहे या पार्श्वभूमीवर परिसरातील महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक ८ औंध व बोपोडी परिसरातील प्रचार यंत्रणा तसेच नागरिकांपर्यंत सामाजिक प्रश्न मांडण्यासाठी यंत्रणा तयार करण्याचे मुद्दे यावेळी चर्चेदरम्यान मांडण्यात आले. महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते भाजपा विरोधात ठामपणे काम करतील असा आशावाद यावेळी स्थानिक नेत्यांनी व्यक्त केला. तसेच औंध व बोपोडी परिसरातील क्रॉस वोटिंग टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात अशी मांडणी यावेळी अदिती गायकवाड यांनी केली.
























