मातोश्री महिला सामाजिक संस्थे तर्फे महिलांसाठी खेळ-रंगणार पैठणीचा होम मिनिस्टर कार्यक्रमाचे माऊली गार्डन बाणेर येथे आयोजन

पुणे : मातोश्री महिला सामाजिक संस्था यांच्या वतीने महिलांसाठी खास आयोजित करण्यात आलेला खेळ-रंगणार पैठणीचा होम मिनिस्टर कार्यक्रम येत्या २१ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम माऊली गार्डन,बणेर, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अभिनेत्री व निवेदिका सौ. मेघनाताई झुझम (भिंबर पाटील) या होम मिनिस्टर म्हणून उपस्थित राहणार आहेत. महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळ, प्रश्नमंजुषा व आकर्षक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सहभागी महिलांसाठी अनेक बक्षिसांचीही रेलचेल असणार आहे.

कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून मंजुताई वाघमारे तर विशेष उपस्थिती म्हणून आपली देव माणूस फेम लाडकी सरु आज्जी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी  सौ. ज्योती नितीन चांदेरे यांनी विशेष पुढाकार घेतला असून त्यांच्या नेतृत्वाखाली मातोश्री महिला सामाजिक संस्था सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवत आहे.

या कार्यक्रमात टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, स्कूटरसह अनेक आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली असून महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

See also  ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्याकडून चंद्रकांतदादा पाटील यांचे कौतुक