शिवसेना महिला आघाडी वडगावशेरी मतदार संघाच्यावतीने मंगळागौरी स्पर्धा सौ.नेहा योगेश शिंदे यांनी स्पर्धेतून महिलांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले – सौ.वृषाली श्रीकांत शिंदे

वडगावशेरी : महिलांकरिता शिवसेना महिला आघाडी वडगावशेरी मतदार संघ यांनी भव्य मंगळागौरी स्पर्धेचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम विभाग प्रमुख वडगावशेरी सौ.नेहा योगेश शिंदे यांनी आयोजित केला होता. या स्पर्धेमध्ये पुणे शहरातील अनेक मंडळांनी सहभाग घेत आपली कला सादर केली.

या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून वृषाली श्रीकांत शिंदे, ठाणे नगरसेविका नम्रता भोसले, रुपाली रेपाळे, महाराष्ट्र पर्यटन विजेते सपना शिंदे, प्राची राऊळ या उपस्थित होत्या. या कार्यक्रमादरम्यान प्रथम पारितोषिक – रणरागिणी गट, द्वितीय पारितोषिक – अंतरानाद गट, तृतीय पारितोषिक – स्वामिनी गट या 3 गटांनी बक्षिसे जिंकली. सहभागी प्रत्येक गटांना देखील बक्षिसे देण्यात आली.

यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख अजय भोसले,शिवसेना शहर प्रमुख प्रमोद भानगिरे , युवासेना सचिव किरण साळी, श्री. उल्हास भाऊ तुपे (जिल्हा प्रमुख) ,शिवसेना उपशहर प्रमुख श्री सुनील जाधव,शिवसेना महिला शहर प्रमुख सौ लीना ताई पानसरे, बापू खरात, सचिन चव्हाण ,मा.सुहास फुलचंद कांबळे (प्रभाग प्रमुख येरवडा,शिवसेना) आणि सर्व शिवसैनिक उपस्थित होते.

See also  जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशन च्या वतीने आज पाषाण पोलीस चौकीला प्रिंटर भेट