पाषाण : सुस बाणेर पाषाण प्रभाग क्रमांक ९ मध्ये काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवार माजी नगरसेवक तानाजी निम्हण यांनी पाषाण गावठाण व महाळुंगे परिसरामध्ये बैठका घेत प्रचाराला सुरुवात केली. यावेळी काँग्रेस पक्षाचे राज्य सरचिटणीस व सातारा जिल्हा प्रभारी उमेश कंधारे उपस्थित होते.
पाषाण येथील गावठाण व सर्वे नंबर एक मध्ये माजी नगरसेवक तानाजी निम्हण यांनी प्रचार पत्रकांचे वाटप करत तसेच नागरिकांच्या गाठीभेटी घेत प्रचार केला.
काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीचे मतदान या परिसरामध्ये आहे. काँग्रेस पक्षाने तयार केलेले अनेक कार्यकर्ते सध्या भाजपात कार्यरत असले तरी त्यांची मूळ विचारसरणी ही काँग्रेसची आहे. काँग्रेस पक्षाचा मतदार आजही या परिसरामध्ये आहे. नगरसेवक असताना मी केलेली कामे नागरिकांच्या स्मरणात आहेत. आजही नागरिक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मला मागील काळात केलेल्या कामांची आठवण करून देतात. सध्याच्या परिस्थितीमध्ये पाषाण सुतारवाडी सोमेश्वरवाडी लम्हाण तांडा परिसराकडे दुर्लक्ष झाले आहे यामुळे विकास कामे रखडली असून ही पूर्ण करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव पक्षाची विचारधारा घेऊन रिंगणात उतरलो आहे असे तानाजी निम्हण यांनी यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सांगितले. यावेळी मोठ्या प्रमाणात युवा कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.























