औंध मधील नागरी प्रश्नांवर मनीषा विकास रानवडे यांचा नागरिकांशी थेट संवाद

औंध : औंध–बोपोडी परिसरातील विविध नागरी समस्यांबाबत प्रभाग क्रमांक ८ मधील नागरिकांशी मनीषा विकास रानवडे यांनी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या संवाद कार्यक्रमात भाजी मंडईची दुरवस्था, सार्वजनिक क्रीडांगणांचा अभाव, तसेच आरोग्य व कचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

परिसरातील भाजी मंडईत स्वच्छतेचा अभाव, अपुरी सोय आणि वाहतुकीची कोंडी यामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत उपस्थितांनी आपली मते मांडली. तसेच लहान मुले, युवक व ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या क्रीडांगणांची संख्या व सुविधांबाबतही नागरिकांनी चिंता व्यक्त केली.

आरोग्य विषयक समस्यांमध्ये डासांची वाढ, अस्वच्छता आणि नियमित कचरा उचल न झाल्यामुळे निर्माण होणाऱ्या आजारांच्या धोक्याकडेही लक्ष वेधण्यात आले. कचरा वर्गीकरण, ओला–सुका कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कामकाजात सुधारणा करण्याची मागणी नागरिकांनी केली.

यावेळी मनीषा विकास रानवडे यांनी नागरिकांचे सर्व प्रश्न गांभीर्याने ऐकून घेत संबंधित विभागांकडे पाठपुरावा करून या समस्या सोडवण्यासाठी ठोस प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. “नागरिकांच्या सहभागातूनच परिसराचा सर्वांगीण विकास शक्य आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. या संवादामुळे औंध–बोपोडीतील नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

See also  सारथी संस्थेमध्ये छत्रपती शाहू महाराज जयंती करण्यामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, 'स्वराज्य' पक्षाची मागणी - डॉ. धनंजय जाधव (स्वराज्य सरचिटणीस)