ऐश्वर्य कट्ट्यावर जमली राजकारणापलीकडच्या किस्स्यांची मैफिल

कात्रज : राजकारणातले आणि राजकारणापलीकडचे असंख्य किस्से आणि हास्य कल्लोळात बुडालेली सकाळ… अशा धमाल आणि रंगतदार वातावरणात ऐश्वर्य कट्ट्याची मैफिल रंगली. कट्ट्याचे मानकरी होते राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दिपक मानकर, भाजपचे राज्य प्रवक्ते संदीप खर्डेकर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश घुले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, उद्योजक काका धर्मावत व माजी विरोधी पक्षनेते दत्ताभाऊ सागरे… या सगळ्यांनी मैफिलीत कमालीची रंगत आणली.


दीपक मानकर म्हणाले, आम्ही लाल मातीशी जोडलेली माणसं आहोत. आई वडिलांची पुण्याई असल्याने आजवरची वाटचाल केली. आयुष्यात येणारी माणसं जोडण्याचा मी सातत्याने प्रयत्न केला. त्यातूनच आजवरची वाटचाल झाली आहे. अप्पानी आयुष्यभर माणसं जोडायचे काम केले आहे आज ऐश्वर्य कट्ट्यावर येऊन मनापासून आनंद झाला आहे. शेकडो माणसं विविध क्षेत्रातील जोडली जात आहेत याचा आनंद आहे.
संदीप खर्डेकर म्हणाले, गोपीनाथजी मुंडे, लक्ष्मणभाऊ जगताप ,सतीशजी मिसाळ यासारखी चांगली माणसं आयुष्यात आली आणि त्यातून मी घडत गेलोय, राजकारणात लोकांना खरं बोललेल आवडतं नाही बरं बोललेलं आवडतं. पण जे काही वाट्याला आलंय त्यात समाधानी आहे.


काका धर्मावत यांनीही सुरेश कलमाडी यांच्यासमवेतचे अनुभव आणि आपली राजकीय वाटचाल उलगडली. गणेश घुले यांनी आपल्या आयुष्याची संघर्षमय वाटचाल सांगितली व राजकीय व सहकार क्षेत्रातील किस्से सांगून मैफल रंगवली. दत्ता सागरे यांनी रक्तपात टाळा रक्तदान करा. हा संदेश देत असतानाच राजकारणातील गमतीशीर किस्से सांगून धमाल उडवून दिली.
शंखनाद करून मान्यवरांचे औक्षण करून स्वागत केले. त्यांना मोत्याची माळ, शाल, शिंदेशाही पगडी, सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. दीपकभाऊंच्या सुरेल गीताने सांगता झाली.
याप्रसंगी विलासराव भणगे ,परागजी पोतदार ,युवराज रेणुसे, एड. दिलीप जगताप, मधुकर कोंढरे ,शंकरराव कडू, नेमीचंद सोलंकी, सर्जेराव शिळीमकर, महावीर डाकलिया, आकाश वाडघरे, संदीप फडके, मंगेश साळुंखे, शिरीष चव्हाण, मनोज तोडकर ,जयदीप निंबाळकर, अक्षय लीमन ,संदीप भोसले, सुनील सोनवणे व आप्पा रेणुसे मित्र परिवार उपस्थित होता.

See also  न्या.शिंदे समितीच्या आढावा बैठकीत जात नोंदींच्या पुराव्याबाबत सविस्तर चर्चा