विश्वासघात करून एबी फॉर्म देण्याचे टाळल्याने निष्ठावंतांचा प्रभाग क्रमांक 33 मधून अपक्ष पॅनल.

खडकवासलाः महानगरपालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम  सुरू झाल्यानंतर निष्ठावंतांना आपल्या पक्षाकडून उमेदवारी मिळण्याचा विश्वास असताना अगदी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांचा  विश्वासघात झाल्याचे चित्र निष्ठावंतांमध्ये आहे. याचाच प्रत्येक महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या खडकवासला शिवणे धायरी  या भागाचा समावेश असलेल्या प्रभाग क्रमांक 33 मध्ये आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निष्ठावंत निकटवर्तीय खडकवासल्याचे माजी सरपंच सौरभ मते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते राहुल पोकळे यांना आला.  सौरभ मते आणि राहुल पोकळे यांना शेवटच्या क्षणापर्यंत पक्षाचा एबी फॉर्म मिळाला नसल्याने उमेदवारी अर्ज छाननी मध्ये त्यांची उमेदवारी अपक्ष म्हणून वैध झाली. त्यामुळे त्यांनीही अपक्षांचा  पॅनल करण्याचे ठरविले. 

सौरभ जयसिंग  मते यांच्या मातोश्री जयश्री जयसिंग मते,
नांदेडचे अविनाश लगड यांची पत्नी भाग्यश्री अविनाश लगड आणि शिवणे  येथील अतुल दिगंबर दांगट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते राहुल सदाशिव पोकळे यांचा अपक्षांचा पॅनेलपहिले थेट निवडणुकीच्या रिंगणात असल्याने प्रतिस्पर्धी असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यात चौरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.

See also  द डेटाटेक लॅब्समध्ये अत्याधुनिक AI रिसर्च लॅबचे चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन