कर्तव्यपथावर सदैव एकनिष्ठ – माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर

उड्डाणपुलाचे शिल्पकार’ ही लोकांनी दिलेली  बिरुदावली आजही कायम

विवेकानंद काटमोरे
हडपसर : एक चांगला माणूस म्हणून माजी राज्यमंत्री, आमदार बाळासाहेब शिवरकर यांना येथील सामान्य माणूस ओळखत आहे. उड्डाणपुलाचे शिल्पकार, शहराबरोबर हडपसर उपनगर आणि आसपासच्या ग्रामपंचायतींचा चेहरामोहरा बदलण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. शहराचे नियोजन करून सुधारणा
करण्यासाठी केंद्र तसेच राज्याकडून जास्तीत जास्त निधी आणून उपनगराला जगाच्या नकाशावर झळकवण्यासाठीचे शिवरकर यांनी शर्थीचे प्रयत्न केले आहेत. त्यांची जनसामान्यामधील प्रतिमाच त्यांचे कार्य सांगून जात असल्याचे आजपर्यंतचा
जिताजागता इतिहास आहे. आजवर माजी आमदार बाळासाहेब शिवरकर यांनी परिसराच्या विकासासाठी विविध माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी आणला आहे.


रामटेकडी येथील पाण्याची टाकी, कचरा डेपो हटवण्यासाठीचे त्यांचे सनदशीर मार्ग आणि उद्योगजगताला आवश्यक त्या सोयीसुविधा पुरवण्यासाठीचा पाठपुरावा. औद्योगिक कारखान्यामध्ये काम करणारा वर्ग त्यांच्यासाठी आवश्यक प्रशिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्था उभाण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. हडपसर उपनगराचा वाढता विस्तार पाहून या परिसरात शासकीय रुग्णालय असावे यासाठी त्यांनी आजही राज्य आणि केंद्र पातळीवर प्रयत्न सुरू आहेत, त्याला लवकरच यश येईल अशीही सामान्यांना आशा वाटत आहे. शिवरकर यांना वडिलांचा राजकीय वारसा लाभला. त्यामुळे त्यांनी १९७४ साली नगरसेवक म्हणून वानवडी येथून निवडून गेले. येथूनच त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. त्यांच्या कामाचा आवाका पाहून त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे अवघ्या दहा वर्षांत पुणे शहराचे महापौरपद मिळवण्यात त्यांनी मजल मारली. राजकीय कारकीर्दीतला चढता आलेख लाभलेले पुण्यातील ते एकमेव व्यक्तीमत्त्व असावे. पुणे महानगरपालिकेचा कारभार चालवित असताना विकासाच्या विविध योजना राबविल्या. त्यामध्ये शहरातील पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता, आरोग्याच्या सुविधा,
घरकुले, उद्याने, रुग्णालये, शाळा महाविद्यालय अशा वेगवेगळ्या प्रकल्प राबवून त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाची चुणूक दाखवून दिली. १९७४ मध्ये नगरसेवक असताना किर्लोस्कर कंपनीजवळील पहिला उड्डाणपुलाचा पाठपुरावा करून ते काम तडीस नेले.
हा सर्वात मोठा प्रकल्प करणारे शहर आणि उपनगराचा विकास साधणारे एकमेव नगरसेवक होते. स्वर्गीय अण्णासाहेब मगर यांनी रामटेकडी येथील १९७२ साली पाणी योजना राबविली. मात्र ,ती दुष्काळामुळे बंद पडलेली ही योजना १९८५ साली बाळासाहेब शिवरकर यांनी महापौर झाल्यानंतर शासनाची मंजुरी घेऊन व पाठपुरावा करून येथे स्वतंत्र पाण्याची टाकी उभारली. याचवेळी पूर्वी कालव्यातून टाकीमध्ये सोडले जाणारे पाणी शिवरकर
यांनी बंद करून बंद जलवाहिनीच्या माध्यमातून या टाकीमध्ये आणून ‘टाकले. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न सुटला. सुरुवातीलाच वानवडीमध्ये बकरहिल येथे ६० हजार लिटरच्या टाकीची क्षमता वाढवून ती ६० हजार लाख लिटरची केली. हे करीत असताना लष्कर पाणीपुरवठा येथील जलशुद्धीकरण प्रकल्पही तेवढ्याच क्षमतेने वाढवला. यामुळे बकरहील पाणी योजनेच्या
माध्यमातून वानवडी, कोंढवा, कॅन्टोन्मेंटमधील परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठी मदत झाली.सुटण्यास रामटेकडी येथील उदासीनबाबा यांची जागा पालिकेच्या माध्यमातून ताब्यात घेऊन या ठिकाणी ९० लाख लिटरची पाण्याची टाकी उभारली. त्यामध्ये लष्कर पाणीपुरवठा विभाग ते रामटकेडी दरम्यान भूमिगत जलवाहिनी टाकून पाणी आणले. या टाकीतून हडपसर, मुंढवा, खराडी, तुकाईटेकडी, ससाणेनगर, महंमदवाडी परिसरातील पाण्याची समस्या सोडवली. लष्कर परिसरातील व येथे पाण्याच्या टाकीमध्ये येणारे पाणी हे घेतले जात होते. मात्र त्याची अशुद्धता पाहून ते बंद जलवाहिनीच्या माध्यमातून नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी शिवरकर यांनी प्रयत्न केले. कात्रज, धनकवडी, पद्मावती, तळजाई या ठिकाणीही पाण्याच्या टाक्या उभारून पाणीपुरवठा सुरळीत केला. नगरसेवक असताना या सर्व परिसरात १०० टक्के भूमिगत गटार योजना राबविली आणि ती पूर्णही केली.
बाळासाहेब शिवरकर यांनी राज्यमंत्री असताना पुणे विद्यापीठ चौक, सेव्हन लव्हज चौक, राहुल सिनेमा चौक, हडपसर या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अद्ययावत पद्धतीने उड्डाण पुल बांधले. त्याचबरोबर वाडिया महाविद्यालय, बी.टी. कवडे रोड उदयबागजवळ, मगरपट्टा मुंढवा, थेऊर, फुरसुंगी सासवड रस्ता, जेजुरी, दौंड आणि केडगाव येथील रेल्वे उड्डाणपुलही त्यांच्याच कारकीर्दीत झाले आहेत. हे सर्वउड्डाण पुल करीत असताना त्यांच्या मंजुरीपासून ते जागा संपादित करणे, निधी उभारणे व पुलांची उभारणी करणे यातील बारीकसारीक गोष्टीवर लक्ष ठेवून तो येथील नागरिकांच्या सोयीचा होण्यासाठी नागरिकांसह शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्या दृष्टीने त्याची उभारणी पूर्णत्वास नेली.या शिवाय मांजरी खुर्द व मांजरी बुद्रुक या गावांना जोडणारा मुळा-मुठा ‘नदीवरील संगमवाडीचा पुल, मुंढवा-खराडी पुल आणि विशेष महत्त्वाचे म्हणजे रावेत आणि
पुनावळे यांना जोडणारा प्रसिद्ध लंडन ब्रीजच्या धाटणीचा लंडन ब्रीजही उभारला.

See also  अनुसूचित जाती प्रवर्गातील 2022 च्या सर्व संशोधक विद्यार्थिना बार्टी मार्फत देण्यात येणारी संशोधन अधिछत्रवृती (फेलोशिप) द्यावी - आम आदमी पार्टीची मागणी


कात्रज, सातारा, सासवड, कोंढवा, पिसोळी, मंतरवाडी येथे बायपास रस्त्याचे काम केले. सोलापूर रस्ता आणि नगरसस्ता जोडण्यासाठी मगरपट्टा-खराडी-मुंढवा उड्डाण पुल करून रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण केले. बाणेर रस्ता रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम त्यांनीच पूर्ण केले आहे.पूल,पालखी मार्ग म्हणून सासवड रस्ता रुंदीकरण केले. दिवेघाटापर्यंतचा रस्ता रुंदीकरण, बोपदेव घाटापर्यंतचा रस्ता रुंद करून धोकादायक वळणे काढली आहेत. केंद्र शासनाच्या मदतीने कात्रज घाटाची दुरुस्ती आणि रुंदीकरण केले बारा वाड्यांसह फुरसुंगी,मांजरी, केशवनगर, साडेसतरानळी या सर्व ग्रामपंचायतीच्या हद्दीत पक्क्या रस्त्यांचे एक जाळे उभारले. विशेष बाब म्हणजे भैरोबा पंपिंग स्टेशन ते कोंढवा या दरम्यानच्या अंतरात तीन फूट व्यासाच्या ड्रेनेज वाहिन्या टाकून या परिसरातील ड्रेनेजचा प्रश्न सोडविला. सासवड रस्ता, तसेच सोलापूर रस्ता रुंदीकरणाचा प्रश्नही त्यांनी धसास लावला. यासाठी सोलापूर रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामासाठी सुमारे ३० कोटीची तरतूदही केंद्र शासनाच्या माध्यमातून शिवरकर यांनी केली होती. या ठिकाणी गल्लीबोळातला रस्ता पक्का करून दिला. या सर्व ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याची समस्या सोडवली. या शिवाय या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये स्मशानभूमी, समाजमंदिर, व्यायामशाळा बांधल्या. व्यायामशाळा आणि ग्रामपंचायत कार्यालय अशा सुमारे ५० अद्ययावत व प्रशस्त वास्तू उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला.गावागावातील ओढ्यावरील छोटे पूल (साकव) बांधले. कॅन्टोन्मेंट, पुणे शहर,हडपसर परिसर या ठिकाणी शाळा, कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालय, मराठी इंग्रजी,उर्दू माध्यमांच्या शाळांना मान्यता देण्यासाठीही त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले.


संगणक शाळा उभारून नव्या तंत्रज्ञानाची परिसराला ओळख करून दिली. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डातील जुन्या जलवाहिन्या बदलून त्या नवीन टाकल्या. हे करीत असताना कॅन्टोन्मेंट हद्दीतील पाण्याचा दर हा पालिका हद्दीतील पाणीदरापेक्षा अधिक होता तो समान करून नागरिकांचा आर्थिक बोजा कमी केला. वर्षोनवर्षे आतंकवाद आणि नक्षलवादाशी सामना करत असलेल्या तसेच नागरिकांना संरक्षण देणाऱ्या पोलीस बांधवांसाठी उभारण्यात येणाऱ्या इमारती, प्रशिक्षण केंद्रासाठी महाराष्ट्र पोलिसांना शासनाकडून सुमारे ५२ लाख रुपयांचा निधी मिळवून दिला. महात्मा फुले स्मारक उभारणीसाठी सुमारे अडीच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. एस.आर.पी.एफ.मध्ये मोठ्या सुधारणा केल्या. वडकी येथील शेतक यांच्या सुमारे एक हजार २५० एकरांवर वन विभागाचे आरक्षण पडले होते. त्यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला होता. त्यांचा हा प्रश्न आरक्षण उठवून सोडवला. विठ्ठलराव शिवरकर सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून वानवडी येथील १०१ बटालीयनमध्ये शिवाजीमहाराजांचा
ब्राँझचा पुतळा उभा केला. साळुंके विहार येथे वीर सैनिकांचा पुतळा उभारला.

See also  राज्यातील विद्यापीठांनी सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंग यादीत येण्यासाठीगुणात्मक सुधारणा करावी


अण्णासाहेब मगर महाविद्यालयात अण्णासाहेबांचा पुतळा उभा केला. पुण्यातील महात्मा फुले स्मारकाची सुधारणा करत असताना येथे वास्तव्यास असलेल्या अनेक कुटुंबांचे पुनर्वसन केले. त्यावेळी पालिकेला भरावा लागणारा निधी प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिला.
पुरंदर तालुक्यातील खानवडी या महात्मा फुले यांच्या जन्मगावी त्यांच्या जन्मस्थळाची डागडुजी करून स्मारक उभारण्यासाठी मदत केली. त्यानंतर तेथे महात्मा फुले यांचा ब्राँझचा पुतळा उभारला. त्याच ठिकाणी स्वतंत्र वाचनालयही सुरू करण्यात आले आहे.या शिवाय या परिसरातील अनेक क्रीडा स्पर्धांना आमदार निधीतून भरघोष मदत केली. पुण्यातील नामवंत सिद्धार्थ वाचनालय अद्यावत पद्धतीने तयार करून त्यासही निधी उपलब्ध करून दिला.
या संस्थेचे ते विश्वस्त आहेत. आजवर समाजसेवेबरोबर रुग्णसेवाही आपली समजून बाळासाहेब शिवरकर यांनी हृदयविकार, मूत्रपिंडविकार, कॅन्सर आदी दीर्घ आजाराने त्रस्त असलेल्या गोरगरिब रुग्णांना मुख्यमंत्री व आमदार निधीतून वेळोवेळी मदत केली. हडपसर-कॅन्टोन्मेंट परिसरातील विधवा, परित्यक्त्या, अंध-अपंग, निराधार,कुष्टरोगी यांच्यासाठी संजय गांधी निराधार योजनेतून आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याचे काम केले. परिसरातील शेकडो लोकांना त्याचा फायदा मिळाला. कुष्ठरोगी रुग्णांना बीपीएल कार्डही मिळवून दिले. याशिवाय परिसरतील अपंग व अंध शाळांना वेळोवेळी सर्वतोपरी मदत करीत असताना येथील अपंग कल्याणकारी संस्थेला मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या निधीतून दहा लाख रुपये मिळवून दिले. याशिवाय अनेक छोट्यामोठ्या संस्थांना आमदार निधीतून मदत केली आहे.काँग्रेस पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून बाळासाहेब शिवरकर यांची ओळख आहे.
१९७४ ते १९९२ सालापर्यंत सलग तीन वेळा नगरसेवक, १९८४ साली महापौरपद आणि १९९०, १९९९ आणि पुन्हा २००४ साली आमदार म्हणून लोकमतातून ते निवडून गेले. दरम्यान बांधकाम राज्यमंत्री व उत्पादनशुल्क मंत्रीपदाची धुराही त्यांनीसमर्थपणे सांभाळली. नंदूरबार जिल्ह्याचे पालकमंत्री तर सातारा, जळगाव, हिंगोली येथील काँग्रेसचे संपर्कमंत्री म्हणून पक्षहिताचे काम सातत्याने चालू ठेवले. दरम्यान १९९० ते १९९१ या कालावधीत पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपदीही त्यांनी मोठ्या कार्यकुशलतेने पार पाडले. काँग्रेस पक्षातूनच त्यांची गायवासरू या चिन्हावरच राजकीय कार्याची सुरुवात केली. त्यानंतर शिवरकर यांनी मागे वळून पाहिले नाही.या परिसरातील ससाणे मास्तर, शिवाजीराव घुले, विठ्ठलराव गाडगीळ, सुरेश कलमाडी, विठ्ठलराव तुपे या उमेदवारांसाठी वेळोवेळी निष्ठावान कार्यकर्ता म्हणून काम केले. त्याप्रमाणे पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जास्तीत जास्त मतदान करून घेतले आणि हा परिसर कायम काँग्रेसचा बालेकिल्ला ठेवण्यासाठी शिवरकर यांनी जिकीरीचे प्रयत्न केले, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही डॉ. अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे यांच्यासाठी हिरीरीने भाग घेऊन प्रचार केला आणि मताची मोठी ताकद उभी केली. कात्रज, रामटेकडी या परिसरात सर्व धर्मासाठी स्मशानभूमी, दफनभूमी, कब्रस्थान, ख्रिश्चन सेमेटरी यांची सुधारणा करून आवश्यक त्या ठिकाणी त्याची उभारणीही केली. ‘खासगी सोसायट्यांमधील मोकळ्या जागा उपलब्ध करून तेथे वेगवेगळे प्रकल्प राबविले आहेत. हडपसर परिसरात रामटेकडी येथे असलेल्या झोपडपट्टीवासियांसाठी मुलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या ठिकाणी रस्ते, वीज, पाणी, स्वच्छतागृह यांची उभारणी करण्यासाठी बाळासाहेब शिवरकर यांनी झोकून देऊन काम केले. हडपसर – कॅन्टोन्मेंट परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा आणि मनोरंजनाचे केंद्र उभारले आहे. हडपसर परिसरातील औद्योगिक वसाहत, रामटेकडी, कोंढवा येथील औद्योगिक वसाहतीमध्ये विशेष सुधारणा करण्यात आल्या आहेत. उरुळी देवाची-फुरसुंगी येथील कचरा डेपोमुळे येथील नागरिकांचे आरोग्य अनेक वर्षांपासून धोक्यात आहे. या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी विधानसभेपासून ते पालिकेपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून पाठपुरावा करून प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू
ठेवले आहेत. “सामाजिक, शैक्षणिक, विकास कामे करीत असताना नागरीक आणि त्यांचे प्रश्न आपले समजून त्या ठिकाणी कुठल्याही गोष्टीची तडजोड न करता नागरिकांना पुरेपूर सुविधा
देऊन त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आजवर शिवरकर यांनी अथक प्रयत्न केले आहेत.

See also  भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पुतळ्यास पुष्पहार , नागरिकांना लाडू वाटप व बाल मेळावा आयोजन


पुणे शहर, पालिका, कॅन्टोन्मेंट, हडपसर परिसर तसेच लगतच्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये आजवर केलेली विकास कामे ही शिवरकर यांची प्रतिमा उंचावणारीच आहे.आता यावरच न थांबता भविष्यातही येथे असणाऱ्या विविध समस्या सोडविण्यासाठी तसेच अनेक सुविधा उपलब्ध करून देऊन विकास साधण्यासाठी सक्रीय राहणार असल्याचे दिसून येते. केशवगर-मुंढवा परिसरातील सर्व रस्ते डांबरीकरण करण्यासाठी तसेच पुल उभारणीसाठी सुमारे सव्वा कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली होती. यासाठी सोलापूर रस्त्यावरील मांजरी फाटा, लुल्लानगर, कात्रज, कोंढवा या ठिकाणी उड्डाण पुल उभारणे. पालिकेच्या अंतर्गत असलेल्या डी. पी. रस्त्याचे डांबरीकरण करणे, खराडी रोड, केशवनगर – मुंढवा चौक या ठिकाणीही उड्डाण पुल उभारणे, मांजरी खुर्द, मांजरी बुद्रक या गावांना जोडणारा नवीन उंच पूल बांधणे, गायकवाडवाडी येथील रेल्वे उड्डाण पुल, तसेच ससाणेनगर येथे भुयारी मार्ग, काळेपडळ येथे रेल्वे उड्डाण, घोरपडी येथील उड्डाणपुल आणि मांजरी बुद्रुक येथे उड्डाण पुल उभारणे.
वीज कंपनीच्या सर्व खांबावरील विद्युत वाहिन्या व सातववाडी येथील उच्चदाब वाहिनी भूमिगत करणे, प्रत्येक वॉर्डात आणि विभागात भाजी मार्केट विभागून वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी प्रशस्त पार्किंग उभारणे या परिसरातील हद्दीत रेशिंग कार्यालय आणणे, देवाची उरुळी येथील कचरा डेपोचे विभाजन करून शहराच्या चारही बाजूला कचरा डेपोचे विभाजन करणे, परिसरातील जुन्या घरमालकांना घरटी शौचालय देणे, महिला बचत गटांसाठी स्वतंत्र बाजारपेठ उपलब्ध करून देणे व त्यासाठी विक्री केंद्र उभारणे आदींसाठी शर्थीचे प्रयत्न केले यातील अनेक कामे मार्गीही लावली तर काही कामाचा आजही ते पाठपुरावा करीत आहेत. या शिवाय हडपसर परिसरातील औद्योगिक क्षेत्रातील मोकळ्या जागा संपादीत करून जनतेच्या हिताचे प्रकल्प या ठिकाणी उभारून नवा रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे.ससाणेनगर परिसरातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच स्मशानभूमी, दफनभूमी, कबरस्थान, ख्रिश्चन सेमेटरी बांधणार आहेत. बहुमजली उड्डाण पूल व मेट्रो, अद्ययावत भाजी मंडई, एसटी बस स्थानक, पोलीस स्टेशन, पोस्ट ऑफिस,इतर कार्यालये यांची उभारणी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणारआहेत. विधानसभेच्या कार्यकाळात सुमारे ४ हजार लक्षवेधी प्रश्न विचारून अनेक मंत्र्यांना निरुत्तरीत केले. या वेळी विधानसभेतील ९९ टक्के उपस्थितीही लक्षणीय ठरली.मधल्या काळात कोणत्याही पदावर नसतानाही माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी जनतेला वाऱ्यावर सोडले नाही. प्रत्येकाची समस्या, अडीअडचणी सोडवण्यासाठी त्यांच्या घराची दारे सदैव उघडीच असतात. आजही दररोज घरी येणाऱ्या प्रत्येकाला मानसन्मान देऊन त्याचे असलेले समस्या अडीअडचणी सोडवण्याचे काम शिवरकर कुटुंबियाकडून केले जाते. काँग्रेस बरोबर गेली अनेक वर्ष एकनिष्ठ राहून त्या ठिकाणी काँग्रेस व मित्र पक्षांना वाढवण्यासाठी निष्ठावंत राहिलेला शिवरकर साहेबांना विधानसभेत पुन्हा पाठवण्याची मागणी काँग्रेस कार्यकर्त्या मधून होत आहे.