परितोष सोसायटी, बालेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांचा संवाद दौरा

बालेवाडी : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बालेवाडी येथील परितोष सोसायटीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांनी भेट देत सोसायटीतील रहिवाशांशी थेट संवाद साधला. यावेळी सोसायटीतील पायाभूत सुविधा, सुरक्षितता, स्वच्छता तसेच दैनंदिन नागरी समस्या यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या संवाद दौऱ्याला पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या नवनिर्वाचित कार्याध्यक्षा सौ. वैशालीताई कमाजदार यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ. गायत्री मेढे-कोकाटे, श्री. बाबुराव चांदेरे, सौ. पार्वती निम्हण तसेच अमोल बालवडकर उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी येणाऱ्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत या चारही उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.

परितोष सोसायटीतील नागरिकांनी वेळेत निर्णय घेणारी, नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवणारी आणि प्रत्यक्ष कामातून विश्वास निर्माण करणारी राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यपद्धती सकारात्मक असल्याचे मत व्यक्त केले. नागरिकांचा हा प्रतिसाद प्रेरणादायी असून जबाबदारीची जाणीव अधिक दृढ करणारा असल्याचे उमेदवारांनी सांगितले.

बालेवाडी परिसराचा सर्वांगीण विकास साधताना सोसायटीतील प्रत्येक नागरिकाच्या गरजांना प्राधान्य देत सुरक्षित, स्वच्छ व सुविधा-संपन्न परिसर निर्माण करण्यासाठी अधिक प्रभावी, पारदर्शक व लोकाभिमुख कार्य करण्याचा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

See also  आम आदमी पार्टी, पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रचाराच्या शुभारंभाला श्री.मोरया गोसावी मंदिरातून सुरूवात