राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा भाजप मध्ये प्रवेश ; प्रभाग ८ मध्ये भाजपला बळकटी

पुणे : प्रभाग क्रमांक ८ औंध- बोपोडी मध्ये भाजपला आणखी बळकटी मिळाली आहे. या प्रभागातील राष्ट्रवादी काॅग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार वसुंधरा निरभावने यांच्यासह माजी नगरसेविका शैलजा खेडेकर , माजी नगरसेविका अर्चना कांबळे, शिवसेना ठाकरे गटाचे नाना वाळके, शशिकांत पांडूळे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये  भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिध्दार्थ शिरोळे तसेच पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देशात व राज्यात सुरू असलेला विकासाचा प्रवाह सर्वसामान्यांच्या मनात आश्वासक भविष्याचा विश्वास निर्माण करत आहे. याच विश्वासातून हे सर्व नगरसेवक भाजप मध्ये सहभागी झाल्याने प्रभाग ८चे भाजपचे उमेदवार सनी निम्हण यांनी सांगितले.  सनी निम्हण यांच्यासह आमदार  शिरोळे यांनी या पक्षप्रवेशासाठी मोलाची भूमिका निभावली.

या सर्व अनुभवी आणि कार्यतत्पर कार्यकर्त्यांचे भाजप परिवारात स्वागत करण्यात आले असून, त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रवेशामुळे भारतीय जनता पक्षाचे सर्वसमावेशक धोरण आणि विकासाच्या प्रवासात सर्व घटकांना सामावून घेण्याची भूमिका अधोरेखित होत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. औंध–बोपोडी प्रभागात या प्रवेशामुळे भाजपची ताकद निश्चितच वाढली असून, विकासाचे ध्येय गाठण्यासाठी भारतीय जनता पक्ष हाच एकमेव पर्याय असल्याची भावना नागरिकांच्या मनात दृढ होत चालल्याचेही नमूद करण्यात आले. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेची ही भावना अधिक ठळकपणे समोर येईल, असा विश्वासही निम्हण यांच्यासह सर्व उपस्थितांनी यावेळी  व्यक्त केला.

See also  विकसित भारत संकल्प यात्रेचा उपक्रम राज्यात प्रभावीपणे राबविण्यात यावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे