प्रभाग ९ ब मध्ये ‘शिट्टी’ वाजणार!
अपक्ष उमेदवार प्रमोद निम्हण यांना निवडणूक चिन्ह जाहीर

औंध : सुस–बाणेर–पाषाण प्रभाग क्रमांक ९ ब मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेल्या माजी नगरसेवक प्रमोद निम्हण यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी “शिट्टी” हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे.

प्रमोद निम्हण हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून इच्छुक उमेदवार होते. मात्र पक्षाकडून तिकीट नाकारण्यात आल्यानंतर पाषाण, सुतारवाडी व सोमेश्वरवाडी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. याच पार्श्वभूमीवर निर्धार सभा घेण्यात आली होती, तर पाषाण ग्रामस्थांनी पाषाण बंद पुकारत आपली भूमिका स्पष्ट केली होती.

या सर्व घडामोडींनंतर प्रमोद निम्हण यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केल्याने प्रभागातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून त्यांची उमेदवारी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
दरम्यान, प्रभाग ९ ब मध्ये प्रमोद निम्हण यांना “शिट्टी” हे चिन्ह मिळाले असून, त्यांच्या सहकारी अपक्ष उमेदवार पुनम विधाते यांना प्रभाग ९ क मध्ये “कपबशी” हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे.

उमेदवारांना अधिकृतपणे चिन्ह वाटप झाल्यानंतर आता अपक्ष उमेदवारांचा प्रचार वेग घेणार असून, येत्या निवडणुकीत कोणाचे पारडे जड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

See also  वसंत मोरे यांनी घेतली शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट