सुतारवाडी ग्रामस्थांचा मनसे उमेदवार मयूर सुतार यांना जाहीर पाठिंबा

सुतारवाडी : सुस–बाणेर–पाषाण | प्रभाग क्रमांक ९ (ड)
प्रभाग क्रमांक ९ सुस बाणेर पाषाण मधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार मयूर सुतार यांनी पाषाण येथील सुतारवाडी व सोमेश्वरवाडी परिसरात मतदारांच्या गाठीभेटी घेत जोरदार प्रचार केला. प्रचारादरम्यान त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत स्थानिक प्रश्न जाणून घेतले.

पाषाण सुतारवाडी व सोमेश्वरवाडी परिसरातून प्रभाग क्रमांक ९ (ड) गटामधून पक्षाच्या अधिकृत चिन्हावर निवडणूक लढवणारे मयूर सुतार हे एकमेव उमेदवार आहेत. त्यामुळे स्थानिक उमेदवार म्हणून त्यांना नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळताना दिसत आहे.

याच पार्श्वभूमीवर सुतारवाडी ग्रामस्थांच्या बैठकीमध्ये ग्रामस्थांच्या वतीने मयूर सुतार यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. स्थानिक प्रश्नांची जाण, परिसराशी असलेली नाळ आणि थेट संवाद साधण्याची भूमिका यामुळे मयूर सुतार यांच्याबाबत नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

या जाहीर पाठिंब्यामुळे प्रभाग क्रमांक ९ (ड) गटामध्ये मयूर सुतार यांची भूमिका अधिक लक्षवेधी ठरत असून निवडणुकीच्या राजकीय समीकरणांमध्ये मनसेला बळ मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे.

See also  निवडणूक कामकाजाकरीता नियुक्त अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न