खानापूर येथे भर दिवसा सोन्याच्या दुकानावर सशस्त्र दरोडा; एक कोटी रुपये किमतीचे सोने लुटले

खडकवासला:  पुणे – पानशेत रस्त्यावरील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या खानापूर येथील वैष्णवी ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानावर अंदाजे पाच ते सहा सशस्त्र दरोडेखोरांनी  दरोडा टाकून साधारण एक कोटी रुपये किमतीचे 70 ते 80 तोळे सोने लुटल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दिवसा बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांनी  दरोडेखोरांचा पाठलाग करत गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांना कळताच पोलिसांची पथके परिसरामध्ये दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी रवाना झाली आहेत.

अत्यंत वर्दळीच्या पुणे पानशेत रस्त्यावरील खानापूर येथील वैष्णवी ज्वेलर्सचे दुकान नेहमीप्रमाणे सकाळी उघडण्यात आले. ग्राहकांची वर्दळ असतानाच दुपारी बाराच्या दरम्यान दोन दुचाकीवरून पाच ते सहा तरुण तोंडाला मास्क बांधून कोयत्यासह दुकानात आले. दुकानातील मालकाला आणि कामगारांना कोयत्याचा धार दाखवून त्यांच्याकडून दुकानातील 70 ते 80 तोळे सोने घेऊन पसार झाले. दुकान मालकाने बाहेर सांगताच स्थानिक तरुणांनी त्यांचा पाठलाग केला. दुकानातील  सोन्याचे अलंकार, दागिने  घेतानाचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद  झाल्याचे दिसत आहे.

घटनेची माहिती कळताच हवेली पोलीस पाण्याच्या पोलीस निरीक्षक वैशाली पाटील, हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनीलकुमार पुजारी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक अविनाश शेळीमकर यांनी घटनास्थळाची पाहणी करून 35 पोलिसांची सहा पथके रवाना करत दरोडेखोरांचा माग काढत परिसर पिंजून काढत आहेत.

See also  भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने लोकशाहीर, थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन