गेरा बांधकाम व्यावसायिकाकडून 6 कोटी 94 लाख 08 हजार आठशे दंड वसूल, आपच्या मागणीला यश

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात गेरा या बांधकाम व्यावसायिकाने विनापरवाना रस्ते खोदाई  केली म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून 6 कोटी 94 08 हजार 800₹ रूपये दंड आकारून वसूल करण्यात आला.

विनापरवाना वॄक्षतोड केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. जॉगिंग ट्रॅकची तोडफोड केली होती त्याचा देखिल दंड त्या बांधकाम व्यावसयिकास लावण्यात आला होता. गेरा बांधकाम व्यावसायिकाचे पिंपरी चिंचवड शहरात चालू असणाऱ्या सर्व बांधकामांची चौकशी करून शहानिशा करावी कि विनापरवाना विद्युत  केबल टाकली आहे का? विनापरवाना वृक्ष तोड केली आहे का? या सर्व मागण्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना केल्या होत्या त्यातील एक मागणी पुर्ण करण्यात आली आहे असे आपचे नेते रविराज काळे यांनी सांगितले.

See also  खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या स्ट्रॉंग रूममध्ये इव्हीएम कमिशनिंगची प्रक्रिया सुरु