पुणे: पुणे ब्रदरहुड फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेली शंभला ब्रदरहुड प्रीमियर लीग (BPL) क्रिकेट स्पर्धा अत्यंत उत्साहात आणि दिमाखात यशस्वीपणे संपन्न झाली. ही स्पर्धा नुकतीच एएफके खडकी येथील मैदानावर दिवस – रात्र प्रकाशझोतात पार पडली. या स्पर्धेत सनराईज गणराज जायंट्स संघाने पुरुष गटाचे विजेतेपद पटकावले, तर बी अँड बी बॅशर्स उपविजेते ठरले. महिला गटात पीकेजी येरवडा स्ट्रायकर्स विजेते, तर पीकेजी प्राधिकरण पँथर्स उपविजेते ठरले.
या स्पर्धेत पुरुष गटातील ७ संघ आणि महिला गटातील ४ संघ सहभागी झाले होते. तीन दिवस चाललेल्या चुरशीच्या सामन्यांमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रेक्षकांचे मन जिंकले. स्पर्धेसोबत आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्निव्हलमुळे क्रीडासोबतच मनोरंजनाचाही संगम साधला गेला. विविध खेळ, खाद्यपदार्थ आणि उपक्रमांमुळे संपूर्ण परिसर उत्सवमय झाला होता.
या प्रसंगी मुख्य अतिथी अरुण ठाकूर (चीफ इंजिनिअर, खडकी अॅम्युनिशन फॅक्टरी) उपस्थित होते. या यशस्वी आयोजनाचे श्रेय ब्रदरहुड चे सीएमडी ईश्वरचंद गोयल , चेअरमन संदीप अग्रवाल, उप-चेअरमन अजय जिंदल, अध्यक्ष सागर अग्रवाल, सचिव कर्नल नरेश गोयल, संचालक पवन बंसल, संजयाकुमार अग्रवाल, राजेश मित्तल, नरेंद्र गोयल, योगेश जैन, योगेश पोद्दार, प्रशांत अग्रवाल, अरविंद अग्रवाल तसेच त्यांच्या संपूर्ण कार्यकारिणीला जाते.
या स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडू: प्रमोद अग्रवाल, सर्वोत्कृष्ट चॅम्पियन खेळाडू: प्रमोद अग्रवाल, सर्वोत्कृष्ट फायटर खेळाडू: अजय जिंदल सर्वोत्कृष्ट चॅम्पियन फलंदाज: अजय जिंदल, सर्वोत्कृष्ट फायटर फलंदाज: पवन बन्सल, सर्वोत्कृष्ट चॅम्पियन क्षेत्ररक्षक: सीए योगेश पोद्दार, सर्वोत्कृष्ट चॅम्पियन गोलंदाज: आदित्य अग्रवाल यांनी महत्वाचे पुरस्कार पटकावत स्पर्धेत आपली छाप सोडली.
शंभला ब्रदरहुड प्रीमियर लीग मध्ये सनराइज गणराज जायंट्स, B&B बॅशर्स, G B स्मॅशर्स, श्रीराम स्ट्रायकर्स, SNPS असेंडर्स, वायुदूत रेसर्स हे पुरुष संघ तर पीकेजी येरवडा स्ट्रायकर्स, पीकेजी प्राधिकरण पँथर्स, पीकेजी मार्केट यार्ड वॉरियर्स, पीकेजी औंध ॲव्हेंजर्स हे महिला संघ सहभागी झाले होते.























