मनपा शाळा दीनदयाळ उपाध्याय शाळेला शिक्षक उपलब्ध व्हावेत अन्यथा मनसे जी-२० व्हिजिट ला काळे झेंडे दाखवणार

पुणे : एरंडवणे येतील पुणे म न पा ची शाळा क्रमांक ७४ दीनदयाळ उपाध्याय येथे शिक्षकांना तीन महिने झाले तरी पगार मिळाला नाही व नविन कायम स्वरुपी शिक्षकांच्या कमतरते मुळे नविन प्रवेशासाठी १५० लहान मुले शिक्षणसाठी वंचित राहु नये म्हणुन शिक्षण अधिकारी मिनाक्षी राऊत यांना घेराव घालून मनसेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

भौतिक सुविधा लवकर करण्यात याव्यात. अन्यथा येऊ घातलेल्या G 20 ची व्हिजिट म्हणजे शाळा आतून भकास बाहेरून झकास दाखविनण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा मनसेच्यावतीने काळे झेंडे दाखवून तिव्र अंदोलन करू असा इशारा देण्यात आला.

यावेळी मनसे शहर सचिव राम बोरकर, विभाग अध्यक्ष सुधीर धावडे, मनविसे शहर प्रमुख अमोल शिंदे ,विराज डाकवे ,किरण ऊभे ,हर्षद खाडे आदी उपस्थीत होते.

See also  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड तारांगण प्रकल्पाचे लोकार्पण