निवडणूक संपल्यानंतरही समाजकार्य सुरूच; सुतारवाडीत मनसेचे मयूर सुतार यांची पुढाकाराने ड्रेनेज स्वच्छता

पाषाण ::सुतारवाडी परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मयूर भगवान सुतार यांनी निवडणूक संपल्यानंतरही समाजकार्य सुरूच ठेवत नागरिकांसाठी दिलासा देणारे काम केले आहे. शिवनगर परिसरात ड्रेनेज लाईन तुंबल्यामुळे काही घरांमध्ये सांडपाणी शिरल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.

ही बाब लक्षात येताच मयूर सुतार यांनी तत्काळ पुढाकार घेत संबंधित यंत्रणांशी समन्वय साधत ड्रेनेजची स्वच्छता करून घेतली. गटारातील अडथळे काढून टाकल्यामुळे सांडपाण्याचा प्रवाह सुरळीत झाला असून परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

निवडणूक असो वा नसो, जनतेच्या अडचणी सोडवणे हेच आपले खरे कर्तव्य असल्याचे यावेळी मयूर सुतार यांनी सांगितले. त्यांच्या या कार्यामुळे शिवनगर व सुतारवाडी परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत आभार मानले आहेत.

See also  जगद्गुरु तुकोबाराय यांची पालखी बोपोडीत अधिक काळ विसावणार