आरक्षणामुळे धायरी शिवणेसह ११ गावांतील शेतकरी भुमिहीन : हवेली कृती समिती आक्रमक

पुणे: २०१७ मध्ये पुणे महापालिकेत समावेश करण्यात आलेल्या धायरी,शिवणेसह ११ गावच्या विकास आराखड्यात बहुतेक शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षणे टाकण्यात आली आहेत त्यामुळे ‌ अनेक शेतकरी भुमिहीन तर काही अल्प सुधारक होणार आहेत. बहुतेक गावात गायरान, सरकार पड अशा जमिनी आहेत त्या जमिनीवर विकास कामांसाठी आरक्षणे टाकण्यात यावीत अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार सर्व पक्षीय हवेली तालुका नागरी कृती समितीने केला आहे..
अन्यायकारक आरक्षणे मागे घेतली जात नाही तोपर्यंत तीव्र लढा देण्याचा आक्रमक पवित्रा कृती समितीने घेतला आहे ‌.
कृती समितीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील यांच्या उपस्थितीत आज धायरी येथे झालेल्या कृती समितीच्या बैठकीत शासनाच्या अन्यायकारक धोरणाचा तीव्र निषेध करण्यात आला.

यावेळी चव्हाण पाटील म्हणाले, पीएमआरडीए ( पुणे महानगर विकास प्राधिकरण) या गावांचा विकास आराखडा मंजूर करणार होते मात्र त्यात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याने शासनाने वरिष्ठ पातळीवर या गावांचा विकास आराखडा तयार केला आहे. त्यामध्ये एक गुंठ्या पासून दोन – तीन एकर जमीनीवर आरक्षणे टाकण्यात आली आहे. यावर मुंबईत हरकती दाखल करण्यात येणार आहेत. पुण्यातील शेतकऱ्यांना हे गैरसोयीचे असुन पुण्यातील विभागिय आयुक्त किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात हरकती दाखल करण्यात याव्यात. या गावात असलेल्या सरकारी जमीनीवर विकास कामे करावी.

कृती समितीचे उपाध्यक्ष पोपटराव खेडेकर म्हणाले,
नवीन कात्रज बाह्यवळण महामार्ग, राष्ट्रीय प्रकल्प, बंधारे आदी कामांसाठी या गावातील शेतकऱ्यांच्या जमीनी मोठ्या प्रमाणात संपादन केल्या आहेत. नागरिककरण वाढल्याने बहुतांश शेतकऱ्यांकडे जमीनी शिल्लक नाहीत ‌ ज्यांच्याकडे थोड्या फार शिल्लक जमीनी आहेत‌ त्यावर आरक्षणे टाकली आहे.
कृती समितीचे निमंत्रक अमर चिंधे पाटील म्हणाले, शासनाने अन्यायकारकपणे विकास आराखडा तयार केला आहे. आमच्या गावात व वाड्या वस्त्यांत मुळ गावठाण विस्तारालाही जागा उरल्या नाहीत त्यामुळे मुळ भुमिपुत्रांचा घराचा प्रश्न गंभीर बनला आहे.

ग्रामपंचायत काळात गायरान जमीनी बेघर भुमि पुत्रांना घरासाठी दिली जात होती.या गायरान जमीनी धनदांडग्या शिक्षण सम्राट, समाजसेवकांना दिल्या आहेत. त्यावेळी विकास कामांकडे शासनाने दुर्लक्ष केले. याचा फटका आता भुमिपुत्रांना बसला आहे. समितीचे सचिव संतोष ताठे म्हणाले, विकास आराखड्यामुळे सर्व शेती उध्वस्त झाली आहे. नेतेमंडळींच्या जमीनीवर आरक्षणे नाहीत. सामान्यांच्या जमीनीवर जाणीवपूर्वक आरक्षणे टाकली आहेत.यावेळी मिलींद पोकळे, संदिप चव्हाण आदी उपस्थित होते ‌.

See also  जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या प्रयत्नांमुळे चक्राकार मार्गाच्या भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात