वायरलेस कॉलनी औंध , नवीन पावसाळी लाईन विकसित करण्याच्या कामाची अधिकाऱ्यांसोबत पाहणी

औंध : वायरलेस कॉलनी औंध , नवीन पावसाळी लाईन विकसित करण्याच्या कामाची अधिकाऱ्यांसोबत पाहणी भाजपाचे मधुकर मुसळे यांनी केली.

पावसाचे पाणी बंगल्यात घुसण्यापासून येथील नागरिकांची कायमची सुटका करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

वायरलेस कॉलनीच्या उत्तरेकडच्या गल्लीत पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचून या सोसायटीतील सभासदारांच्या बंगल्यामध्ये पाणी घुसते व ह्या पाण्याचा निचरा ड्रेनेज लाईनला जोडल्यामुळे ड्रेनेज लाईन मधील घाण पाणी ओव्हर फ्लो होऊन या भागात दुर्गंधी पसरते

हा विषय कायमचा मार्गी लावण्यासाठी महापालिकेचे अधिकारी व सोसायटीच्या पदाधिकारी / सभासदांसोबत कामाची प्रत्यक्ष पाहणी केली

याप्रसंगी अॅड मधुकर मुसळे महापालिकेचे उपा अभियंता श्री आदिवंत, कनिष्ठ अभियंता अश्विनी लांगी ( पथ ) , कनिष्ठ अभियंता योगिता धोत्रे ( ड्रेनेज ) , श्री कुंभार, श्री राजू डुंबरे , श्रीयुत विद्याधर भापकर श्रीयुत अरुण भापकर , सौ बर्गे , श्रीयुत दीक्षित इत्यादी उपस्थित होते.

See also  नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची ईशाळवाडीच्या मुलांसोबत दिवाळी साजरी