पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. ४ : राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. तर चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे सोलापूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले.

सुधारित १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे :

पुणे- अजित पवार

अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील

सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील

अमरावती- चंद्रकांत दादा पाटील

वर्धा – सुधीर मुनगंटीवार

भंडारा- डॉ.विजयकुमार गावित

बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील

कोल्हापूर- हसन मुश्रीफ

गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम

बीड- धनंजय मुंडे

परभणी- संजय बनसोडे

नंदुरबार- अनिल पाटील

See also  काँग्रेस भवन येथे लोकसभा निवडणूक जाहीरनामा बनवण्यासाठी बैठक