डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते चिवरदान व धम्मदान अर्पण

पुणे : महामानव,विश्वरत्न,परमपूज्य डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीच्या पूर्व संध्येला पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या निवास्थानी बौद्ध भन्ते डॉ. राहुल बोधी,भन्ते धम्मसेन बोधी,भन्ते विमल बोधी,भन्ते अनोमादस्सी बोधी यांनी त्रिसरण पंचशील देऊन आपल्या हस्ते पुण्यपारमिता लाभ होत राहो,या करीता मंगल मैत्री दिली.दादांच्या शुभ हस्ते चिवरदान व धम्मदान करून एक अगळ्या, वेगळ्या पद्धतीने जयंतीच्या पूर्व संध्येला जयंती निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.

नामदार चंद्रकांत म्हणाले की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने पुणे शहरात वेगवेगळ्या परिसरात व वस्ती पातळीवर धम्माचे कार्यक्रम व निराधार मुलांना शैक्षणिक उपक्रम आयोजित करावे यासाठीची सर्व प्रकारची मदत करू असे आश्वासन दिले.

कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी पुणे शहर अनुसूचित जाती मोर्चाच्या व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहर यांच्या नियोजनाखाली घेण्यात आला आरपीआयचे प्रदेश कार्याध्यक्ष आसिफ गांगुर्डे, निलेश अल्हाट भाजपचे प्रदेश सचिव अतुल नाना साळवे,विकास सोनवणे,संदीप शेळके संदीप ओव्हाळ,वीरसेन जगताप, धर्मेंद्र खांडरे उपस्थित होते.

See also  शहीद हेमंत करकरे उद्यानातील जागेवर मॅटर्निटी होमचे बांधकाम नको - माजी नगरसेवक योगेश ससाने