इंडियन डेंटल असोसिएशन पिंपरी चिंचवड च्या अध्यक्षपदी डॉ.अतुल पाटील यांची निवड

पिंपरी : आयडीए पिंपरीत चिंचवड शाखेचे मावळते अध्यक्ष डॉ. संतोष पिंगळे यांचा कार्यकाळ संपल्यामुळे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ.अतुल पाटील यांनी शाखेच्या अध्यक्षपदाचा आणि पुढील दोन वर्षांसाठी डॉ. कल्याणी शेळके यांनी सचिव पदाचा कार्यभार स्वीकारला.

मौखिक आरोग्य, कॅन्सर निर्मुलन तसेच दंत सेवा गरिब-आदिवासी, अनाथ गरजू मुलांपर्यंत पोहचवण्यासाठी ते कार्य करणार आहेत. इंडियन डेंटल असोसिएशन, पिं चिं. शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा आयडीएच्या उपाध्यक्ष डॉ. मनिषा गरूड यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी डॉ. अंशुमन राव, डॉ. निखील दिवाण,डॉ.संदीप भिरूड, डॉ.ज्योतिराम पाटील, डॉ. विनय शेट्टी, डॉ.विश्वास पाटील, डॉ.प्रशांत गदीया, डॉ. सुमंत गरूड, डॉ. स्वप्ना निकाजू उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन डॉ. अनुजा पाटील यांनी केले. सभेची सांगता डॉ.संतोष पिंगळे यांच्या निरोपाच्या भाषणाने झाली.

See also  कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात महाराष्ट्र मागे राहणार नाही– चंद्रकांतदादा पाटील