वक्फ बोर्डाच्या जागेवरून मुघलांची टीम माझ्या अंगावर आली होती त्यांना पुणेकरांनी थोपवले; जैन बोर्डींग जागेच्या लढ्याचे यश हे जैन मुनि,  विद्यार्थी, राजू शेट्टी व पुणेकरांचे – रवींद्र धंगेकर

पुणे : वक्फ बोर्डाच्या जागेवरून मुघलांची टीम माझ्या अंगावर आली होती त्यांना पुणेकरांनी थोपवले. माझ्याकडे गोखले, बडेकर व मोहोळ यांच्या विषयी मोठ्या प्रमाणात कागदपत्रे आहेत. मी रोज एक विषय मांडू शकतो परंतु आता आमच्याकडून हे युद्ध संपले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी मला सत्ता ताकीद दिल्यानंतर मी हा विषय माझ्याकडून थांबवला आहे असे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.

एच एन डी जैन बोर्डींग जागा विक्री प्रकरणांमध्ये गोखले बिल्डर यांनी ई-मेलद्वारे व्यवहार रद्द करण्यासंदर्भात पुढाकार घेतल्यानंतर रवींद्र धंगेकर प्रतिक्रिया देत होते. ते म्हणाले जैन बोर्डिंगची जागा विद्यार्थ्यांसाठी वाचवण्याचे श्रेय जैन मुनि, विद्यार्थी समिती व माजी खासदार राजू शेट्टी तसेच या लढ्यात सहभागी झालेल्या पुणेकरांचे आहे.

गैरव्यवहाराच्या विरोधात सर्व पुणेकर एकत्रितपणे लढले त्यांनी सोशल मीडियावरील युद्धाला योग्य प्रकारे उत्तरे दिली. यामुळे हा लढा यशस्वी झाला आहे अशी प्रतिक्रिया रवींद्र धंगेकर यांनी दिली.

See also  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सुतारवाडी स्मशानभूमी येथे वृक्षारोपण