डॉ.बाबासाहेबआंबेडकर यांच्या जयंती निमित्त भव्य पुस्तक वाटप करुन जयंती साजरी.

औंध : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर १३२ व्या जयंती निमित्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित, लेखन आणि भाषण हे पुस्तक वाटप जयंती निमित्त करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन रमेश ठोसर (अध्यक्ष बहुजन उद्धारक सामाजिक संस्था व डॉ.बाबासाहेब जयंती समिती) यांनी केले होते. यावेळी बाबासाहेब कोळी(पी. एस.आय.वाहुतक विभाग चतुर्शिंगी), औंध पोलीस चौकीचे पी.एस. आय मा.बाबासाहेब झरेकर, औंध बाणेर क्षत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त.संदिप खलाटे, मा.नगरसेवक.पुणे म.न.पा. कैलासजी गायकवाड, पोलीस उप निरीक्षक स्पेशल ब्रॅंच पुणे शहर मा.लालचंद ढवळे, पोलीस कर्मचारी , पुणे महानगरपालीका कर्मचारी तसेच निलेश ठोसर, दिलीप गायकवाड , अजय निरवणे , दिनेश ठोसर इ. कार्यकर्ते व महिला व नागरिक उपस्थित होते.

See also  आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या महिला कुस्तीगीरांना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या सर्व साधारण सभेचा पाठिंबा