बाणेर बालेवाडीत एक हजार संविधान पुस्तके डॉ.आंबेडकर जयंती साजरी

बाणेर: शिवसेना युवा सेना उध्दव ठाकरे गट पुणे शहराच्या वतीने आज बाणेर बालेवाडी सुस माळुंगे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त बाणेर बालेवाडी प्रभागात १००० संविधानाचे पुस्तक देऊन जयंती उत्सव साजरा करण्यात आला. बाणेर येथे माजी सरपंच सिद्धार्थ रनवरे, बालेवाडी येथे पोलीस पाटील आनंद कांबळे,सुस येथे सरपंच अपूर्वा ताई निकाळजे ,महाळुंगे येथे ग्रामपंचायत सदस्य संध्याताई कांबळे, दैनिक सकाळ चे जिल्हा प्रतिनिधी बाबा तारे, यांना संविधानाची वाटप करन्यात आले.शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेंरे ,बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.दिलीप भाऊ मुरकुटे ,शिवसकार सेनेचे संपर्कप्रमुख बाळासाहेब भांडे , कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राम गायकवाड, युवासेना पुणे शहरप्रमुख राम थरकुडे, उद्योजक राहुल बालवडकर, शेतकरी संघटनेचे प्रकाश बालवडकर, उद्योजक मोरेश्वर बालवडकर, मनोज बालवडकर, नितीन रनवरे, यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन म्हाळुंगे गावचे सरपंच युवा सेना पुणे शहर उपप्रमुख मयुर भांडे यांनी केले होते.

See also  बारामती मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्गांचा प्रश्ना संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची खासदार सुप्रिया सुळे भेट घेत निवेदन दिले