डॉ.आंबेडकर जयंती निमित्त ॲड.डॉ.मधुकर मुसळे व माजी नगरसेविका अर्चना मधुकर मुसळे यांच्या तर्फे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

औंध : ॲड.डॉ.मधुकर मुसळे व मा नगरसेविका सौ अर्चना मधुकर मुसळे यांच्या तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त औंध येथील  डॉ आंबेडकरांच्या पुतळ्या शेजारी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 152 नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

या शिबिरासाठी बाणेर बालेवाडी हाय स्ट्रीट येथील श्रीराम नेत्रालयाचे डॉक्टर घोष यांनी विशेष सहकार्य केले. तर श्री मिलिंद कदम यांनी नियोजनाची जबाबदारी पार पाडली. औंध येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

See also  बालेवाडी हायस्ट्रीट ग्राऊंड येथे अमोल बालवडकर फाऊंडेशन आयोजित भव्य दहीहंडी उत्सवात ऑलिंपिक विजेता खेळाडू स्वप्नील कुसळे व प्रसिद्ध अभिनेत्री दिशा पटानी यांची उपस्थिती