पुणे शहर काँग्रेस ओबीसी विभागाच्यावतीने ओबीसी प्रवर्गातील विविध मागण्यांचे निवेदन राष्ट्रपतीना पाठविण्यात आले.

पुणे : पुणे शहर काँग्रेस ओबीसी विभागाच्यावतीने ओबीसी प्रवर्गातील विविध मागण्यांचे निवेदन राष्ट्रपतीना पाठविण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या सूचनेनुसार पुणे शहर ओबीसी विभागाच्या वतीने महामहीम राष्ट्रपती महोदय यांना ओबीसी प्रवर्गातील विविध मागण्याबाबत निवेदन सादर करण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.


यामध्ये प्रामुख्याने संपूर्ण देशात जातनिहाय जनगणना करावी. लोकसभा, राज्यसभा,विधानसभा तसेच विधान परिषदेमध्ये महिला आरक्षणाचा ठराव संमत झाला असून 33% आरक्षणापैकी 15%आरक्षण हे ओबीसी महिलांकरता राखीव करण्यात यावे. नॉन क्रिमिलियर ची अट संपूर्णपणे रद्द करण्यात यावी.
या मागण्या करण्यात आल्या असून देशामध्ये ओबीसी आरक्षणाबाबत कायम संभ्रमाचे व अस्थिर वातावरण निर्माण करण्याचे काम चालू आहे. यामुळे समाजामध्ये असंतोष निर्माण होत आहे. तरी कृपया आपण आमच्या वरील मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा अशी विनंती निवेदनात करण्यात आलेली आहे.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी शहराध्यक्ष प्रशांत सुरसे,सुनील पंडित , राजेंद्र बरकडे,उमेश काची, अक्षय सोनवणे ,राजेश जाधव नितीन येलारपुरकर, गणेश साळुंखे ,जीवन चाकणकर, राजू देवकर , रमेश राऊत , योगेश कलकुटे रवींद्र गागडे, फैजान अन्सारी आदि उपस्थित होते.

See also  पीएनजीआरबीच्या राष्ट्रीय मोहिमेत एमएनजीएलचाही सक्रिय सहभाग