बाणेर : बाणेर, विधाते वस्ती, बालेवाडी (मुरकुटे गार्डन), म्हाळुंगे व सुसगाव या परिसरांतील नाल्यांच्या स्वच्छता कामाची नगरसेविका रोहिणी चिमटे यांनी पाहणी केली.
दरवर्षी पावसाळ्यात नागरिकांना पाणी साचणे, नाले तुंबणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागू नये, यासाठी यंदा पूर्वतयारीच्या दृष्टीने ही पाहणी करण्यात आली. पावसाळ्यापूर्वी सर्व नाले तात्काळ स्वच्छ करून पाण्याचा निचरा सुरळीत होईल याची दक्षता घ्यावी, अशा स्पष्ट व ठोस सूचना महापालिका अधिकारी व संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांना देण्यात आल्या.
तसेच, कामाची गुणवत्ता राखून निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले, जेणेकरून नागरिकांना कोणतीही गैरसोय होणार नाही याची खात्री करता येईल.
या पाहणीवेळी कोथरूड उत्तर मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर, मनोज दळवी, अभयजी, शरद भोते, विजया चांदोरकर, राणी मोहिते, राकेश पाडाळे, अमोल लांडे, सागर शिनगारे, भागवत तसेच महापालिका अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर उपस्थित होते.
















