अनुयश आरोग्य प्रतिष्ठानच्या स्टाॅलला  डॉ. रघुनाथ माशेलकर यांची आवर्जून भेट

पुणे : पुण्यातील कर्वे रोड येथील हर्षल हॉल येथे तीन दिवस आयोजित ‘देणे समाजाचे’ या सामाजिक उपक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते झाले.

यावेळी बालमधुमेह क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या अनुयश आरोग्य प्रतिष्ठानच्या स्टाॅलला डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी आवर्जून भेट दिली. यावेळी अनुयश आरोग्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध मधुमेह संशोधक डाॅ. रवींद्र नांदेडकर यांच्याकडून अनुयश आरोग्य प्रतिष्ठानचे कार्य समजून घेत शुभेच्छा दिल्या. सोबत ‘गप्पाष्टक’कार डॉ. संजय उपाध्ये, आर्टिस्ट्रीच्या संस्थापक-अध्यक्ष वीणा गोखले आणि अनुयश आरोग्य प्रतिष्ठानचे विश्वस्त विलास नेवपूरकर आदी उपस्थित होते.

See also  कार्यसम्राट मोफत महा - आरोग्य शिबीर एकाच ठिकाणी तपासणीपासून शस्रक्रियेपर्यंत मोफत सर्वकाही.. रूग्णांनी लाभ घेण्याचे आयोजक सनी निम्हण यांचे आवाहन