पुणे : केन्द्रीय राज्य मंत्री तथा खासदार मुरलीधर मोहोळ, छत्रपती शिवाजी महाराज नगर विधानसभा आमदार सिद्धार्थ शिरोळे, तसेच अभिजीत गायकवाड व सर्व मार्गदर्शकांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज नगर विधानसभा मतदारसंघ – उत्तर मंडळाच्या सरचिटणीसपदी सागर गायकवाड यांची निवड करण्यात आली.
या निवडीप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज नगर परिसरातील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी सागर गायकवाड यांचे अभिनंदन करत संघटन बळकटीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी मार्गदर्शन करताना मान्यवरांनी सांगितले की, संघटनात्मक काम अधिक प्रभावीपणे राबवून पक्षाची ताकद वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे. सागर गायकवाड यांच्या नेतृत्वात उत्तर मंडळात संघटन अधिक गतिमान होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. नवनियुक्त सरचिटणीस सागर गायकवाड यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत, कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षवाढीसाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.























