बाणेर पाषाण लिंक रोड परिसरामध्ये नियमबाह्य स्पीड ब्रेकरचा वाहतुकीला अडथळा

पाषाण : बाणेर पाषाण लिंक रोड परिसरामध्ये नियमबाह्य स्पीड ब्रेकर पुणे महानगरपालिकेनेच तयार केले असून यामुळे या परिसरात वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत.

काही  महिन्यांपूर्वी दुरुस्तीच्या नावाखाली संपूर्ण रस्ता खोदला गेला. यावेळी वाहतूकीस कोणताही बाधा ठरणार नाही असे पादचारी क्रॉसिंग होते. पण रस्ता दुरुस्ती नंतर ते काढले गेले.
गतीरोधक बसविण्याची नागरीकांनी मागणी केली. पण कोणताही ताळेबंद नसलेले उंच गतीरोधक बसविण्यात आले.
त्यामुळे  वाहतूकीस अडथळा निर्माण होवून  वाहन चालकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे.

आय आर डी पी च्या नियमानुसार पादचारी मार्ग तयार करण्यात यावेत. तसेच रस्त्यांमध्ये उंच तयार करण्यात आलेले गतिरोधक तातडीने काढण्यात यावे अशी मागणी नागरिक करत आहेत. पाषाण बाणेर लिंक रोड असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र चत्तुर म्हणाले, पादचारी नागरिकांना रस्ता ओलांडता यावा यासाठी गतिरोधक असलेला पादचारी मार्ग तयार करण्यात यावा अशी मागणी असताना महानगरपालिकाने नियमबाह्य गतिरोधक केल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत.

See also  रायगड येथे ‘शिवसृष्टी’ उभारण्यासाठी ५० कोटींचा निधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे