औंधगावात श्री भैरवनाथ महाराज उत्सव २०२६ निमित्त ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेचे आयोजन

पुणे : औंधगाव येथे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज उत्सव २०२६ निमित्त ‘होम मिनिस्टर’ या आकर्षक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मंगळवार, दि. ५ मे २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौक, औंधगाव येथे होणार आहे.

या उपक्रमाचे प्रमुख आयोजक म्हणून नगरसेविका सौ. भक्तीताई अजित गायकवाड तसेच द युथ सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजित सुभाषदादा गायकवाड हे कार्यरत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. जे. अक्षय (सोशल मीडिया स्टार) करणार असून, स्पर्धेला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

या ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेत सहभागी महिलांसाठी विविध आकर्षक बक्षिसांची रेलचेल ठेवण्यात आली आहे. यामध्ये एलईडी टीव्ही, फ्रिज, पिठाची गिरणी, मोबाईल, कूलर, गॅस शेगडी, उष्ण हवेचा पंखा, मिक्सर, स्मार्ट वॉच आदी बक्षिसांचा समावेश आहे. तसेच १० लकी-ड्रॉ भेटवस्तूंचीही विशेष सोय करण्यात आली आहे.

कार्यक्रमाचे आयोजन औंधगाव विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले असून, श्री. राहुल गायकवाड, श्री. गिरीश जुनवणे, श्री. हेरंब कलापूरे यांसह विश्वस्त आणि पदाधिकारी सक्रिय सहभाग घेत आहेत. तसेच श्री. योगेश जुनवणे, श्री. महेंद्र जुनवणे, श्री. विकास गायकवाड, श्री. सागर गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते आयोजनात सहभागी आहेत.

औंधगाव विश्वस्त मंडळ, सल्लागार व समस्त ग्रामस्थांच्या वतीने सर्व नागरिकांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

See also  जी-20 च्या स्वागतासाठी अनधिकृत केबलची रांगोळी? अनाधिकृत केबल मुळे पालिकेचे करोडो रुपयांचे नुकसान