पुणे : औंध रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पुणे येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे “वोट चोर गद्दी छोड” या घोषणेखाली तीव्र आंदोलन व सह्यांची मोहीम राबविण्यात आली.
या प्रसंगी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार दीप्ती चौधरी, छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघाचे नेते दत्ता बहिरट यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन पार पडले. यावेळी माजी नगरसेवक अजित दरेकर, पुणे शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र भुतडा, माजी नगरसेवक नंदलाल धिवार, शिवसेनेचे बोपोडीचे माजी नगरसेवक संभाजी नाना शिंदे, प्राची ताई दुधाने, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते इंद्रजीत भालेराव, संजय भाऊ अग्रवाल, पुणे शहर काँग्रेसचे सरचिटणीस विनोद रणपिसे, माजी डी.वाय.एस.पी. अनिल पवार (साहेब), ज्येष्ठ नेते सत्तार मिस्त्री, अनवर भाई शेख, खडकी ब्लॉक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सिल्वर अँथोनी, पुणे शहराचे माजी सरचिटणीस अॅड. रमेश पवळे, प्रशांत टेके, युवा काँग्रेसचे सरचिटणीस हर्षल हांडे, राष्ट्रवादी काँग्रेस (श.पा.) पुणे शहराचे सरचिटणीस शशिकांत पांडुळे, ज्योती परदेशी, रमा भोसले, प्राजक्ता गायकवाड, सुंदर ओव्हाळ, माया मोरे, चंदा अंगीर, कांता ढोणे, शोभा अरुडे, प्रियांका मढाले, विकास कांबळे, संतोष पगारे, संतोष वाघमारे, शेख, जय चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपा सरकारने मतदार याद्यांमध्ये केलेला घोळ उघड केल्यानंतर, मतदारांच्या अधिकारांवर होत असलेल्या या अन्यायाविरोधात आज काँग्रेसतर्फे मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी आपला निषेध नोंदविला.
या आंदोलनात काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या तीनही पक्षांचे नेते व पदाधिकारी सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे आयोजन बोपोडी ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विशाल जाधव यांनी केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बो. ब्लॉकचे उपाध्यक्ष व खजिनदार अजित थेरे, प्रभाग क्र. ८ चे अध्यक्ष विठ्ठल आरुडे, खडकी प्रभाग अध्यक्ष भरतसिंग ठाकूर, तसेच पुणे शहर ओबीसी सेलचे उपाध्यक्ष गणेश लालबिगे यांनी विशेष परिश्रम घेतले.
या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते, स्थानिक नागरिक आणि काँग्रेसप्रेमी सहभागी झाले होते.या आंदोलनाचे आयोजन पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि बोपोडी ब्लॉक काँग्रेस कमिटी यांच्या वतीने करण्यात आले होते.