कात्रज येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न

कात्रज : माय माऊली केअर सेंटर लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रज, लायन्स क्लब पुणे चतुर्श्रुंगी लायन्स क्लब ऑफ पुणे मुकुंद नगर एच व्ही देसाई महंमदवाडी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिर माय माऊली केअर सेंटर कात्रज कोंढवा रोड कात्रज येथे शिबिराचे आयोजन केले होते.

यावेळी उपस्थित भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. विजय कुंभार साहेब व लायन्स क्लबचे प्रेसिडेंट सेक्रेट ट्रेझर व लायन्स मेंबर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. 118 नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. 118 नागरिकांची नेत्र तपासणी केली 76 नागरिकांनी बीपी शुगर तपासणी केली 48 नागरिकांची डेंटल तपासणी केली 36 नागरिकांना चष्मे वाटप केले 58 नागरिकांना मोफत औषधी वाटप केली मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी 18 नागरिकांची नोंद झाली शस्त्रक्रियेसाठी त्यांना पुढील आठवड्यामध्ये एच व्ही देसाई हॉस्पिटल येथे शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात येणार आहे.


या कार्यक्रमाला उपस्थित माय माऊली केअर सेंटर व लायन्स मेंबर्स मित्र परिवार सामाजिक क्षेत्रात काम करणारे स्थानिक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.

See also  माय माऊली केअर सेंटर व महा एन्जो फेडरेशनच्या वतीने पालखी सोहळ्यात वैद्यकीय सेवा